How to Check PF Balance Without Internet: PF अकाऊंटचा बॅलेन्स जाणून घेण्याच्या अनेक पद्धती आहेत. तुम्ही EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन PF Account मध्ये किती रक्कम आहे ते बघू शकता. तसेच स्मार्टफोनवरील UMANG अॅप देखील अकाऊंटची माहिती देतो. परंतु या दोन्ही पद्धतींसाठी इंटरनेट कनेक्शन आणि स्मार्टफोनची आवश्यकता आहे.
भारतात सर्वांकडेच स्मार्टफोन नाही तसेच इंटरनेटचा वापर देखील अनेक लोक करत नाहीत. तर काहींना EPFO अधिकृतच्या वेबसाईटवर आणि UMANG APP वर लॉगिन करण्याचं झंझट आवडत नाही. अशा लोकांसाठी आम्ही दोन ऑफलाईन पद्धतींची माहिती घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला इंटरनेटची किंवा अॅपची गरज नाही. PF बॅलेन्स करण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल असणं आवश्यक आहे, फिचर फोन देखील चालेल.
SMS पाठवून मिळवा माहिती
यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 7738299899 या नंबरवर EPFOHO UAN LAN असा मेसेज पाठवावा लागेल. LAN च्या जागी ज्या भाषेत माहिती पाहिजे तिचा कोड टाकायचा आहे. उदाहरणार्थ मराठीमध्ये माहिती हवी असेल तर EPFO UAN MAR लिहून एसएमएस पाठवावा लागेल. म्हणजे तुमच्या अकाऊंटची सर्व माहिती मिळेल.
मिस्ड कॉल देऊन मिळवा माहिती
SMS व्यतिरिक्त तुम्ही एक मिस्ड कॉल देऊन देखील EPF बॅलेन्सची माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 01122901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
हे देखील वाचा:
99.99 टक्क्यांपर्यंत हवा शुद्ध करणारा स्मार्ट एयर प्युरिफायर लाँच; जाणून घ्या किंमत
यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट