शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

Truecaller वरून पटकन डिलीट करू शकता तुमचा मोबाईल नंबर; जाणून घ्या नेमकं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 4:54 PM

Truecaller : Truecaller अ‍ॅप युजर्सच्या पसंतीस उतरले आहे. तसेच अनोळखी नंबरवरून आलेल्या युजर्सची देखील माहिती देते.

नवी दिल्ली - Truecaller चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून अनेकांच्या फोनमध्ये ते हमखास पाहायला मिळतं. Android आणि iOS दोन्ही युजर्ससाठी हे अ‍ॅप मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. अँड्राईड युजर्स ट्रूकॉलर अ‍ॅपला गुगल प्ले स्टोर आणि आयओएस युजर्स अ‍ॅप स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. कॉल येणाऱ्या नंबरच्या युजर्सची त्वरित माहिती मिळत असल्याने Truecaller अ‍ॅप युजर्सच्या पसंतीस उतरले आहे. तसेच अनोळखी नंबरवरून आलेल्या युजर्सची देखील माहिती देते. हे आपल्या सर्व युजर्सच्या एड्रेस बुकमधून कॉन्टॅक्ट डिटेल स्टोर करते. मात्र, तुम्ही Truecaller अ‍ॅपवरील तुमचा नंबर सहज डिलीट करू शकता.

एखाद्या युजर्सने त्यांच्या फोनमध्ये तुमचा नंबर सेव्ह केलेला असल्यास तुमचा मोबाईल नंबर देखील Truecaller वर उपलब्ध असू शकतो. अ‍ॅप सर्व स्कॅम कॉल ट्रॅक करण्याची देखील सुविधा देते. काही लँडलाइनसाठी ट्रूकॉलरमध्ये लँडलाइनच्या एड्रेसचा देखील समावेश आहे. TrueCaller डेटाबेसमध्ये तुमचा मोबाईल नंबर उपलब्ध असल्याने तुम्ही कोणालाही कॉल केल्यास त्वरित त्याची माहिती मिळते. तुम्हाला जर TrueCaller वरील तुमचा मोबाईल नंबर डिलीट करायचा असल्यास सोपी प्रोसेस फॉलो करावी लागेल. TrueCaller अ‍ॅपमधील तुमचा फोन नंबर कसा डिलीट करू शकता हे जाणून घेऊया.

असं डिलीट करू शकता Truecaller account

- सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये Truecaller अ‍ॅप ओपन करा व डाव्या बाजूला वरती असलेल्या मेन्यू सिलेक्ट करा.

- मेन्यू सेटिंग्स निवडल्यानंतर पुढील स्टेपवर जा.

- सेटिंग्समध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळे पर्याय दिसतील. आता ट्रूकॉलर अकाऊंटला कायमचे डिलीट करण्यासाठी मेन्यूमधील प्रायव्हसी सेंटर हा पर्याय निवडा.

-  तुम्हाला ट्रूकॉलर अकाउंट डिलीट करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

- आता Truecaller Search मधून नंबर डिलीट करण्यासाठी Yes पर्यायावर टॅप करा.

- ही स्टेप पूर्ण केल्यानंतर ट्रू कॉलर डेटाबेसमधून तुमचा नंबर डिलीट होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान