शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

सावधान! युझर्सचा डेटा धोक्यात, चीनी कंपन्यांकडून होतेय चोरी, असं बदला सेटींग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 4:14 PM

तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून चीन कंपन्या तुमचा डेटा चोरी करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून चीनी कंपन्या भारतातील युझरांचा डेटा चोरी करत असल्याचं समोर आलं आहे. दुसरकीडे  निवडक अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये आढळणाऱ्या एका फीचरची बरीच चर्चा होत आहे.  काही स्मार्टफोन कंपन्यांच्या फोनमध्ये यूजर्सचा अनुभव जाणून घेण्याच्या नावाखाली यूजरच्या संमतीशिवाय डेटा गोळा केला जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. Realme, Oppo, OnePlus सारख्या चिनी कंपन्यांकडून 'एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिसेस' फीचरद्वारे यूजर डेटा गोळा करत आहेत.

Youtube' चे वर्चस्व संपवण्यासाठी इलॉन मस्कने आखला मोठा प्लॅन! ट्विटरवर आणणार 'हे' फिचर

Realme, OnePlus आणि Oppo स्मार्टफोन्सवर 'एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिस' फिचर बाय डीफॉल्ट सुरू केले आहे. या फिचरबाबत, कंपन्यांचा दावा आहे की, गोळा केला जाणारा वापरकर्ता डेटा वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी आणि डिव्हाइसला ऑप्टिमाइझ करण्यासाठी वापरला जात आहे. हे तीन फोन ColorOS च्या कस्टमाइज्ड व्हर्जनवर चालतात आणि ते चायनीज टेक कंपनी BBK Electronics च्या मालकीचे आहेत.

ColorOS, RealmeUI आणि OxygenOS वर चालणार्‍या सर्व नवीन स्मार्टफोन्समध्ये 'एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिस' फिचर डीफॉल्टनुसार चालू असते.

Realme, OnePlus किंवा Oppo स्मार्टफोन देखील असल्यास, तुम्ही एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिस फिचर बंद करू शकता. युझर्स कंपन्यांना लोकेशन, कॅलेंडर, एसएमएस यासह त्यांची वैयक्तिक माहिती शेअर करण्यापासून थांबवू शकतात.

नवीन सॉफ्टवेअरवर चालणाऱ्या Realme, Oppo आणि OnePlus स्मार्टफोन्सवर वर्धित इंटेलिजेंट सेवा कशी बंद करायची ते जाणून घ्या. हे फिचर बंद केल्याने काही अॅप्स आणि सेवा काम करणे थांबवू शकतात.

अगोदर फोनच्या सेटिंगमध्ये जा.यानंतर Additional Settings वर जा.आता सिस्टम सर्व्हिसेस निवडा.नंतर  Enhanced System Services बंद करानंतर फोन रीस्टार्ट करा. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलchinaचीन