नवी दिल्ली - स्मार्टफोन हा जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच जण मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करतात. पण स्मार्टफोनच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई देखील करता येते. स्मार्टफोनवर अनेक असे पर्याय उपलब्ध आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही हमखास पैसे मिळवू शकता. सोशल मीडियावर विविध विषयांवरील व्हिडीओ अपलोड करून अनेकजण मोठी कमाई करत आहे. गेल्या काही वर्षात व्हिडीओच्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याशिवाय तुम्ही फोनवरून ब्लॉग लिहून देखील कमाई करू शकता.
लोकांच्या आवडीच्या विषय़ावर व्हि़डीओ तयार केल्यास त्याला भरघोस प्रतिसाद मिळतो. सोशल मीडियावर सक्रिय असाल आणि तुमचे जास्त फॉलोअर्स असतील तर हे देखील कमाईचे एक माध्यम ठरू शकतं. यासाठी तुम्हाला फक्त सातत्याने वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडीओ तसेच फोटो अपलोड करावे लागतील. सोशल मीडियावर जास्त फॉलोअर्स असल्यास अनेक कंपन्या त्यांच्या प्रोडक्ट्सची जाहिरात करण्यासाठी तुम्हाला पैसे देतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टार झालेल्यांची संख्या देखील अधिक आहे.
फूड ब्लॉग
खाद्यपदार्थ हे सर्वांनाच आवडतात. खूप जण हे खवय्ये असून खाण्यासाठी नेहमीच विविध ठिकाणांना भेटी देत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर फूड ब्लॉग ट्रेडिंगमध्ये आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये त्या हॉटेल अथवा विशिष्ट पदार्थांविषयी माहिती देऊ शकता. तसेच, सोशल मीडियावर व्हिडिओ देखील पोस्ट करू शकता. तुम्ही जर क्वालिटी कंटेंट सादर केल्यास तुम्हाला प्रमोशन करण्यासाठी देखील पैसे मिळतील. याद्वारे लोक महिन्याला हजारो रुपयांची कमाई करत आहेत. सध्या इन्स्टाग्राम, फेसबुकवर अशाच पोस्ट पाहायला मिळतात.
ट्रॅव्हल ब्लॉग
जर तुम्हाला प्रवास करायला आवडत असेल आणि नवीन ठिकाणे एक्सप्लोर करायला आवडत असतील तर तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉगद्वारे भरपूर कमाई करू शकता. तुम्हाला स्मार्टफोनच्या साहाय्याने तुम्हाला भेट देण्याच्या प्रत्येक ठिकाणाचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचे आहेत आणि नवीन गोष्टी एक्स्प्लोर करण्याची आहेत, मग ते स्थानिक खाद्यपदार्थ असो किंवा तिथली एखादी इमारत. लोकांना ट्रॅव्हल ब्लॉगिंग पाहायला आवडतं आणि आजकाल ते ट्रेडींगमध्ये आहे आणि जर तुम्हाला लाखात कमवायचं असेल तर तुम्ही ही पद्धत वापरून पाहू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.