शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

हॅकर्सना दाखवा ठेंगा; असं करा तुमचं WhatsApp दुप्पट सुरक्षित, जाणून घ्या प्रोसेस  

By सिद्धेश जाधव | Published: May 16, 2022 3:03 PM

WhatsApp वर टू स्टेप व्हेरिफिकेशन फीचर इनेबल केल्यामुळे तुम्ही जास्त सुरक्षित राहू शकता.  

लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp जितकं लोकप्रिय आहे तितकं धोकादायक आहे. जगभरात 200 कोटींपेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह युजर्स असलेल्या प्लॅटफॉर्मवर सायबर क्राईम देखील मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळे या अ‍ॅपची सुरक्षा देखील महत्वाची ठरते. सायबर एक्सपर्टनुसार, अन्य मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स, ई-मेल, बँकिंग अ‍ॅप्स प्रमाणेच इथे देखील टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) म्हणजे टू स्टेप व्हेरिफिकेशन (2SA) इनेबल करणं आवश्यक आहे.  

टू स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल केल्यानंतर युजर एक PIN (पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर) सेट करावा लागेल, जो अ‍ॅपला सुरक्षेची अजून लेयर देतो. इनेबल केल्यानंतर हॅकर्स या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपला लक्ष्य करू शकणार नाहीत. पुढे आम्ही WhatsApp वर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा टू स्टेप व्हेरिफिकेशन कसं इनेबल किंवा डिसेबल करायचं याची माहिती दिली आहे.  

असं करा 2FA इनेबल/डिसेबल 

  • सर्वप्रथम फोनमधील WhatsApp अ‍ॅप ओपन करा. 
  • त्यानंतर सेटिंग्समध्ये जा आणि तिथे दिलेल्या पर्यायांपैकी Account ची निवड करा.  
  • अकाऊंटमध्ये Two-step verification ऑप्शन इनेबल करा. 
  • हे फीचर इनेबल करण्यासाठी तुम्हाला 6 अंकी PIN कोड बनवावा लागेल.  
  • PIN क्रिएट केल्यानंतर कंफर्म करा. 
  • त्यानंतर तुमचा ई-मेल आयडी नोंदवल्यास तुम्ही तुमचं WhatsApp वरून देखील रिकव्हर करू शकता. ही स्टेप तुम्ही सोडू देखील शकता.  
  • त्यानंतर Save आणि Done वर टॅप करून प्रक्रिया पूर्ण करा.  
  • आता तुमच्या WhatsApp वर Two Step Verification इनेबल होईल आणि अ‍ॅपला सुरक्षेपाची अजून एक लेयर मिळेल. ही डिसेबल करण्यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन two-step-verification डिसेबल करा. 
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप