नवी दिल्ली : सध्याच्या काळात स्मार्टफोनची गरज इतकी वाढली आहे की, लोक तो 24/7 सोबत ठेवतात. यामुळे स्मार्टफोनचा वापर हेरगिरीसाठी केला जाऊ शकतो. म्हणजेच तुम्ही कोणाशी बोलत आहात किंवा कोणाला मेसेज करत आहात याची माहिती मिळू शकते. यासाठी अनेक व्हायरस, मालवेअरही रिपोर्ट केले आहेत. बहुतेक लोकांकडे Android स्मार्टफोन आहेत.
अशा परिस्थितीत आपला फोन ट्रॅक होत आहे की नाही, यासंबंधी माहिती शोधू शकता. दरम्यान, तुमची हेरगिरी केली जात आहे, असे तुम्हाला वाटत असल्यास याठिकाणी काही कोड्स तुम्हाला सांगत आहोत. जे तुम्ही तुमच्या फोनच्या डायलपॅडवर टाइप करून तपासू शकता. हे कोड्स डायल केल्यानंतर, तुम्ही कॉल करून डिटेल्स तपासू शकता.
*#21#या कोडद्वारे तुम्ही तुमचे मेसेज, कॉल्स किंवा अन्य डेटा इतर कोणत्याही नंबरवर फॉरवर्ड केला आहे की नाही हे तपासू शकता. कॉल इतर कोणत्याही नंबरवर फॉरवर्ड केला असल्यास, फॉरवर्ड केलेल्या नंबरच्या डिटेल्ससह त्याची देखील माहिती दिली जाईल.
*#62#तुमच्या नंबरवर कॉल केल्यावर नो-सर्व्हिस किंवा नो-अॅन्सर सूचना येत असल्याची तक्रार लोक तुमच्याकडे करतात, तेव्हा तुम्ही हा कोड वापरू शकता. या कोडद्वारे तुम्हाला कळेल की तुमचे कॉल्स, मेसेज किंवा डेटा रीडायरेक्ट झाला नाही.
##002#हा कोड वापरून युजर्सच्या Android फोनचे सर्व रिडायरेक्शनला स्विच ऑफ केले जाते. जेव्हा तुम्ही रोमिंगची योजना आखत असाल आणि कोणत्याही अनव्हांटेज रिडायरेक्ट कॉलसाठी पैसे खर्च करू इच्छित नसाल तेव्हा हे खूप उपयुक्त ठरेल.