Google Pay भारतातील यूपीआय पेमेंटसाठी समानार्थी शब्द बनत आहे. ‘तू दे आता, मी नंतर जीपे करतो,’ हे वाक्य सर्रास ऐकता येतं. अनेकजण मित्रांना, दुकानदारांना पैसे देण्यासाठी, बिल्स व रिचार्जचे पैसे देण्यासाठी आणि ऑनलाईन पेमेंट्ससाठी गुगल पे चा वापर करतात. परंतु याव्यतिरिक्त देखील या लोकप्रिय पेमेंट अॅपमध सुविधा आहेत. यातील फिक्स्ड डिपॉजिटच्या सुविधेची माहिती घेणार आहोत.
Google Pay ने स्मॉल फायनान्स बँकेशीही करार करून ही सुविधा अॅपमध्ये दिली आहे. या एफडीवर व्याज देखील दिला जात आहे. Google Pay युजर्स स्मॉल बँकेच्या फिक्स्ड डिपॉजिटवर 6.35% व्याज मिळवू शकतात.
कमीत कमी 90 दिवसांची गुंतवणूक देखील करता येते. तर जास्तीत जास्त 1 वर्षासाठी पैसे एफडीमध्ये ठेवता येतील. तसेच कमीत कमी 5,000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते आणि जास्तीत जास्त 90,000 रुपये या फिक्स्ड डिपॉजिटमध्ये ठेवता येतात. ही एफडी तुम्ही कधीही विथड्रॉ करू शकता.
गुगल पेवरून फिक्स्ड डिपॉजिट ओपन करण्यासाठी
- सर्वप्रथम Google Pay अॅप ओपन करा.
- अॅपमध्ये Business And Bills समोरच्या एक्सप्लोर या बटनवर क्लिक करा.
- त्यानंतर फायनान्स सेक्शनमध्ये जा.
- तिथे ‘Equitas Small Finance Bank’ वर क्लीक करा.
- Invest Now वर क्लीक केल्यानंतर तुम्ही प्रोसेस सुरु होईल.
- योग्य ती माहिती द्या आणि एफडी ओपन करा.
हे देखील वाचा:
WhatsApp ग्रुप अॅडमिनचं काम सोपं नाही! या 5 चुका घडवू शकतात तुरुंगवास
दिवसभर डेटा पुरत नाही? मग या स्मार्टफोन ट्रिक्स मिळवून देतील तुमचा वाया जाणारा मोबाईल डेटा