इन्स्टाग्रामवर एक मोठा फिशिंग स्कॅम सुरू आहे. या प्लॅटफॉर्मवर लोकांना आमिष दाखवून महत्त्वाची माहिती चोरली जाते. इन्स्टाग्राम हे आजचा सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जिथे फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा परिस्थितीत इन्स्टाग्राम वापरताना काही खास गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
इन्स्टाग्रामवरील स्कॅमर लोकांना मोफत वस्तू, गिफ्ट किंवा अकाऊंट व्हेरिफिकेशनच्या नावाने लिंकवर क्लिक करण्याचं आमिष दाखवतात. अशा लिंक्सवर क्लिक करणं टाळावं कारण ते तुमची ऑनलाईन एक्टिव्हिटी ट्रॅक करू शकतात.
तुम्ही ओळखत नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला मेसेज आल्यास, तुम्ही सतर्क राहा. तुम्ही त्यांचे प्रोफाइल तपासा. जसं की ते अकाऊंट व्हेरिफाईड आहे की नाही. कंटेंट आणि फॉलोअर्सकडे देखील लक्ष दिले पाहिजे. जर काही चुकीचं वाटत असेल तर त्या मेसेजवर प्रतिक्रिया देऊ नका.
वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नका
स्कॅमर अनेकदा तुम्हाला तुमचे पासवर्ड आणि क्रेडिट कार्ड माहिती यासारखी वैयक्तिक माहिती मिळविण्याचं आमिष दाखवतात. अशी माहिती डीएम किंवा कमेंटद्वारे कधीही शेअर करू नका.
OTP शेअर करू नका
इन्स्टाग्रामवर कोणत्याही प्रकारचं व्हेरिफिकेशन होत नाही. अशा परिस्थितीत तुमच्या फोनचा ओटीपी कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.