शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

Wi-Fi चा पासवर्ड विसरलात? अजिबात टेन्शन घेऊ नका, वापरा हे भन्नाट जुगाड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 09:59 IST

अशा प्रकारे तुम्ही तुमचा वाय-फाय पासवर्ड रिकव्हर करू शकता.

How To Recover Wi-Fi Password: वाय-फाय पासवर्ड असा आहे की तो पुन्हा पुन्हा टाकण्याची गरज पडत नाही. त्यामुळे कालांतराने तो पासवर्ड आपल्या लक्षात राहत नाही. जर एखाद्या मित्राने किंवा नातेवाईकाने तुमचा वाय-फाय पासवर्ड विचारला, तर आपण आमच्या वाय-फाय पासवर्डसाठी काय शब्द किंवा अंक ठेवलेत (How To Recover Wi-Fi Password) हेच विसरून गेलेलो असतो. नवीन फोन किंवा डिव्हाइस कनेक्ट करताना वायफाय पासवर्ड विचारला जातो. पण कितीही विचार केला तरीही आपल्याला तो काही केल्या आठवत नाही. मग तो कसा रिकव्हर करायचा, हेच आपण पाहूया.

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, हे Wi-Fi हॅक करण्यासाठीच्या सूचना नाहीत. कारण एखादं वाय-फाय हॅक करणं बेकायदेशीर आहे आणि तुम्ही त्या संदर्भात काही केलंत तर अधिक गंभीर संकटात सापडू शकता. या बातमीत आम्ही फक्त तुमचा स्वतःचा Wi-Fi पासवर्ड रिकव्हर करण्यासाठी काय करावं ते सांगत आहोत. तुम्ही तुमचा Wi-Fi नेटवर्क पासवर्ड विसरला असल्यास, तो रिकव्हर करण्यासाठी पुढील स्टेप्स कराव्या लागतात.

वाय-फाय पासवर्ड कसा रिकव्हर करायचा?

तुम्हाला ऑफिस किंवा इतर कोणत्याही वाय-फायचा पासवर्ड जाणून घ्यायचा असेल तर ही पद्धत पासवर्ड दाखवणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही विसरलेला पासवर्डच यातून दिसू शकेल.

अशा प्रकारे करा पासवर्ड रिकव्हर...

- Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट केलेला पीसी वापरून, Start > Control Panel > नेटवर्क अँड शेअरिंग सेंटर वर जा.- Windows 8 कॉम्प्युटरवर, तुम्ही Windows Key +C वर टॅप करू शकता, सर्च वर क्लिक करू शकता आणि नेटवर्क आणि शेअरिंग सेंटर शोधू शकता.- डाव्या साइडबारवरील चेंज अॅडाप्टर सेटिंग्ज वर क्लिक करा.- तुम्ही वापरत असलेल्या वाय-फाय नेटवर्कवर राईट-क्लिक करा आणि Status वर क्लिक करा.- वायरलेस प्रॉपर्टीजवर क्लिक करा आणि सिक्युरिटी टॅबवर क्लिक करा.- आता तुम्हाला Wi-Fi नेटवर्कचे नाव आणि छुपा पासवर्ड दिसेल. खाली दिलेल्या चेक कॅरेक्टर्सवर क्लिक करताच पासवर्ड दिसेल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानWiFiवायफाय