JioCloud :मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्सने (Reliance) आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत JioCloud सेवा लॉन्च केली आहे. या नवीन प्रोग्राम अंतर्गत Jio आपल्या युजर्सना 100GB पर्यंत मोफत स्टोरेज देत आहे. JioCloud ची Google आणि iCloud शी थेट स्पर्धा असेल. सध्या क्लाउड मार्केटमध्ये या दोन कंपन्यांचे वर्चस्व आहे. विशेष म्हणजे, Google आपल्या युजर्सना 15GB मोफत स्टोरेज देते, तर iCloud वर फक्त 5GB स्टोरेज मिळते.
अशा परिस्थितीत Jio कडून 100 GB मोफत स्टोरेज युजर्ससाठी वरदान ठरणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, JioCloud वर आपला डेटा अपलोड कसा करायच्या? तर, Jio Cloud वर फाइल अपलोड करणे खूप सोपे आहे. तुम्हीदेखील Jio Cloud सोप्या पद्धतीने फाइल्स/डेटा अपलोड करू शकता. JioCloud मध्ये मीडिया फाइल्स अपलोड करण्याचे दोन मार्ग आहेत.
- तुम्हाला तुमचा सर्व डेटा निवड न करता थेट अपलोड करायचा असेल, तर सेटिंग्ज स्क्रीनवर जाऊन 'ऑटो बॅकअप' चालू करा आणि तुम्हाला बॅकअप जी फाइल बॅकअप घ्यायची, ती सलेक्ट करा.
- तुम्हाला ठराविक फोटो, व्हिडिओ, म्युझिक किंवा डॉक्युमेंट अपलोड करायचे असल्यास, फाइल्स स्क्रीनवरील ‘अपलोड (+)’ बटणावर क्लिक करा आणि तुम्हाला अपलोड करायच्या असलेल्या फाइल निवडा.
- डेस्कटॉपवरुन फाइल्स ट्रान्सफर करण्यासाठी तुमच्या PC किंवा Mac वरील JioCloud फोल्डरमध्ये आवश्यक फाइल टाका. वेबवरून फाइल्स अपलोड करण्यासाठी, 'अपलोड फाइल्स' पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला एकाच वेळी अनेक फाइल्स किंवा फोल्डर्स अपलोड करायचे असल्यास, तुम्ही JioCloud वेबसाइटवर उपलब्ध बल्क अपलोडर वापरू शकता.
क्लाउड स्टोरेज म्हणजे काय?क्लाउड स्टोरेज ही कॉम्प्युटर डेटा स्टोरेजची पद्धत आहे. यामध्ये डेटा डिजिटल पद्धतीने सुरक्षित केला जातो. यामध्ये यूजर फोन किंवा डिव्हाईसपासून वेगळ्या सर्व्हरवर डेटा साठवतो. या सर्व्हरची देखभाल थर्ड पार्टी प्रोव्हायडरद्वारे केली जाते. तुम्हाला सर्व्हर पुरवणारा व्यक्ती/संस्था या डेटासाठी जबाबदार असतो.