Free Fire MAX मध्ये ग्लू वॉल सारखे अनेक कॉस्मेटिक आयटम मिळतात. हे आयटम्स फायटिंगच्या वेळी गेम चेंजर ठरतात. या ग्लू वॉलच्या मागे राहून शत्रूपासून वाचता येतं. तसेच या वॉल्स शत्रूला मारण्यातही मदत करतात. त्यामुळे यांचा योग्य वापर फ्री फायर्स प्लेयर्सना करता आला पाहिजे. इथे आम्ही काही टिप्स दिल्यात आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही फक्त Gloo Walls योग्य रित्या वापरू शकाल.
ग्लू वॉलच्या मदतीनं प्रो प्लेयर्सना देखील द्या मात
वापर आधीच ठरवून घ्या
ग्लू वॉलचा वापर कशासाठी करायचा हे ठरवून घ्या. म्हणजे तशी परिस्थिती उद्भवल्यास तुम्ही या आयटमचा वापर वेगाने करू शकाल. तुम्हाला जास्त विचार करून वेळ वाया घालवावा लागणार नाही.
वेग आणि वेळ महत्वाचा
फ्री फायर मॅक्समध्ये Gloo Walls योग्य वेळी आणि वेगानं वापरणाऱ्या प्लेयर्सना जास्त यश मिळतं. या वॉल्स योग्य वेळी उभ्या केल्यास शत्रूची हालचाल मर्यादित करता येते. त्यांना जागा बदलावी लागते, तसेच ते एकाच जागी अडकून राहतात.
कॅरेक्टर आणि पेट एबिलिटीचा वापर करा
वेगवेगळ्या एबिलिटीसह कॅरेक्टर आणि पेट या गेममध्ये मिळतात, त्यांचा वापर करून ग्लू वॉल आणखीन खरतनाक बनवता येते.
लांबून फायरिंग होत असल्यास?
ग्लू वॉल्सचा वापर कधी करायचा हे गेमर्सच्या लक्षात आलं पाहिजे. Free Fire MAX मध्ये ग्लू वॉल तुम्हाला जवळून होणाऱ्या फायरिंगपासून वाचवू शकते. जर दुश्मन दुरून फायर करत असेल तर ग्लू वॉलचा वापर सुरक्षेसाठी करू नये.
महत्वाची गोष्ट
लढाई करताना ग्लू वॉलची जागा आणि टायमिंग सर्वात जास्त महत्वाचं असतं. एक जरी चुकलं तरी ग्लू वॉल कुचकामी ठरते. योग्य जागी वॉल न लागल्यास शत्रूला शूटिंग अँगल बदलावा लागत नाही. तसेच टायमिंग देखील चांगलं असलं पाहिजे.
हे देखील वाचा: