आवड म्हणून किंवा गरज म्हणून आपण अनेक अॅप्स आपल्या Android फोनमध्ये इन्स्टॉल करतो. काही अॅप्स तात्पुरते असतात तर काही अॅप्स आपण डाउनलोड करून वापरायला विसरतो. हे अॅप्स स्मार्टफोनमधील स्टोरेज खातात, त्यात जर ऑटो अपडेट सुरु असेल तर त्यांचा आकार वाढत जातो. अशात जर तुमच्या फोनमध्ये स्टोरेज कमी असेल तर ऐनवेळी तुम्हाला अनेक अॅप्स उडवून टाकावे लागू शकतात.
एक-एक करून अॅप डिलीट करणे थोडं कंटाळवाणे आहे. एक अॅप अनइन्स्टॉल केल्यावर काही वेळ थांबावे लागते मग दुसऱ्या अॅपकडे वळता येते. परंतु Android फोन युजर्स एकसाथ अनेक अॅप्स अनइन्स्टॉल करू शकतात. जर तुम्हाला स्मार्टफोनमधील अनेक अॅप्स एकसाथ अनइन्स्टॉल करायचे असतील तर पुढे आम्ही संपूर्ण प्रक्रिया सांगितली आहे.
अँड्रॉइडमध्ये एकसाठी अनेक अॅप्स कसे डिलीट करायचे?
- यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर ओपन करा.
- तिथे उजवीकडे वरच्या बाजूला असलेल्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा.
- आता समोर आलेल्या ऑप्शनमधून Manage Apps and device सिलेक्ट करा.
- इथे तुम्हाला दिसेल फोनची किती स्टोरेज वापरली जात आहे, त्यावर क्लिक करा.
- इथे तुम्हाला तुमच्या फोनमधील सर्व अॅप्स दिसतील, यात सर्वाधिक स्टोरेज वापरणारे अॅप्सवर असतील.
- जे अॅप्स डिलीट म्हणजे अनइन्स्टॉल करायचे असतील त्यांच्यासमोरील बॉक्सवर क्लिक करा.
- त्यानंतर वर असलेल्या डिलीट आयकॉनवर क्लिक करा.
- आता एक पॉप-अप ओपन होईल, त्यात Uninstall वर क्लिक करा. म्हणजे तुम्ही निवडलेले सर्व अॅप्स एकसाथ अनइन्स्टॉल होतील.