YouTube खूप लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग अॅप आहे. काही लोक याचा वापर करमणुकीसाठी करतात तर काही लोक अभ्यासासाठी. तुम्ही जे व्हिडीओज बघता किंवा शोधात त्याच्या आधारावर तुम्हाला अजून व्हिडीओज दाखवले जातात. थोडक्यात तुम्ही काय बघता हे ट्रॅक केले जाते. जर तुम्हाला तुम्ही काय बघता हे हिस्ट्रीमध्ये सेवा करू द्यायचे नसेल तर तुम्ही या अॅपमधील इनकॉगनिटो मोडचा वापर करू शकता. (Turn on incognito mode in YouTube app to avoid tracking)
YouTube च्या अॅपमध्ये incognito मोड फीचर देण्यात आला आहे. हा इनकॉगनिटो मोड YouTube अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही अॅपसाठी देण्यात आला आहे. Incognito मोड वापरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अॅप अपडेट करावा लागेल.
युट्युब इनकॉगनिटो मोड अश्याप्रकारे करा अॅक्टिव्हेट
सर्वप्रथम YouTube अॅप उघडा. अॅपमध्ये सर्च बारच्या उजवीकडे जर तुम्ही लॉगिन केले असेल तर तुमचा गुगल प्रोफाइल फोटो दिसेल. त्या प्रोफिले फोटोवर क्लीक करा. त्यानंतर तुम्हाला Turn on इनकॉगनिटो असा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. इनकॉगनिटो मोडवर क्लिक केल्यानंतर खाली लिहून येईल कि, You're in incognito. तसेच, सर्च बारच्या उजवीकडे देखील तुम्हाला इनकॉगनिटोचे चिह्न दिसेल.
Incognito मोड अॅक्टिव्हेट झाल्यानंतर तुम्ही बघितलेले व्हिडीओ हिस्ट्रीमध्ये दिसणार नाहीत. सर्चबारच्या बाजूला असलेल्या इनकॉगनिटो चिन्हवर क्लिक करून तुम्ही पूर्वीप्रमाणे व्हिडीओज बघू शकता.