शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

एका स्मार्टफोनवर अशाप्रकारे वापरा दोन व्हॉट्सअ‍ॅप अकॉउंट; जाणून घ्या पद्धत 

By सिद्धेश जाधव | Published: November 04, 2021 8:19 PM

How to Use two WhatsApp Account in One Smartphone: जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये एकसाथ 2 WhatsApp अकॉउंट वापरायचे असतील तर पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

How to Use two WhatsApp Account in One Smartphone: व्हॉट्सअ‍ॅप भारतातील लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. दिवसेंदिवस या अ‍ॅपमधील फिचर वाढत आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅपवर यूपीआय पेमेंटचा पर्याय उपलब्ध झाला आहे. हे फिचर वापरण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप आणि बँकेकडे दिलेला नंबर एक असणे गरजेचे असते. या नियमामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वच युजर्स एकच नंबर सगळीकडे एकच नंबर वापरत नाहीत. त्यामुळे एकाच फोनमध्ये 2 WhatsApp अकॉउंट वापरावे लागतात, एक मेसेजिंगसाठी तर दुसरं पेमेंटसाठी. 2 व्हॉट्सअ‍ॅप नंबर वापरणे सोप्पे आहे.  

यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅप देखील इन्स्टॉल करण्याची गरज नाही. या प्रश्नाचे उत्तर स्मार्टफोन कंपन्यांनी दिले आहे. युजर्सना Android फोनवर एकाच अ‍ॅपचे दोन वेगवेगळे व्हर्जन बाळगता येतात. यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.  

How to Use two WhatsApp Account on One Smartphone 

  • सर्वप्रथम फोनच्या सेटिंगमध्ये जा. 
  • तिथे तुमच्या मोबाईल कंपनीनुसार Dual/Parallel/App Clone या नावाचे फीचर मिळेल. 
  • त्यावर क्लिक करा, म्हणजे अनेक अ‍ॅप्स दिसतील. 
  • त्यातील WhatsApp समोरील टॉगलवर क्लिक करा. 
  • प्रोसेस पूर्ण होऊ द्या. आता तुमच्या होम स्क्रीनवर नवीन WhatsApp आयकॉन एका छोट्या मार्कसह दिसेल. 
  • नवीन व्हॉट्सअ‍ॅप ओपन करून सेटअप करून घ्या.  

अशाप्रकारे एकाच फोनमध्ये 2 WhatsApp अकॉउंट वापरता येतील. यासाठी Xiaomi फोन्समध्ये Dual apps ऑप्शन आहे. तर Samsung फोन्समध्ये Settings मध्ये Advance features मध्ये जाऊन Dual Messenger, OnePlus Settings मध्ये Utilities मध्ये Parallel Apps, Realme फोन्सच्या App management मध्ये App cloner, Oppo च्या Settings मध्ये App Cloner आणि Vivo च्या Settings मध्ये Apps and notifications मध्ये App Clone नावाचे फीचर आहे.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड