नवी दिल्ली : इंटरनेट क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी गुगलने आपल्या डिजिटल पेमेंट अॅप Google Pay वर मोठी घोषणा केली आहे. 18 सप्टेंबरला या अॅपला लाँच होऊन वर्ष होणार आहे. यानिमित्त 18 सप्टेंबरपर्यंत या अॅपवर पाच व्यवहार केल्यास पाच रुपयांपासून 1 लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.
गुगलने Google Pay च्या वर्षपूर्तीनिमित्त ऑफर्स जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 5 कोटींची बक्षिसे दिली जाणार आहेत. ऑफरकाळात एका युजरला एकदाच बक्षिस मिळणार आहे. त्यासाठी पैसे पाठवणाऱ्याकडे गुगल पे चे अपडेट व्हर्जन असायला हवे.
गुगल पे हे अॅप नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) द्वारे बनविल्या गेलेल्या यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआई) सिस्टीमवर आधारित आहे. 18 सप्टेंबरच्या सकाळी 9 वाजेपर्यंत यासाठी व्यवहार करावे लागणार आहेत . या ऑफरसाठी केवळ गुगल पेच्या अॅपवरून दुसऱ्याबाजुच्या पे अॅपवर व्यवहार करणारेच पात्र ठरणार आहेत. याशिवाय दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठविणे, दुकानदाराला कॅश मोडमध्ये पैसे देणे, दुकानदाराच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविणे आणि गुगल पे (तेज) युपीआय आयडीच्या युजर्सना पैसे पाठविणारे युजर्स या ऑफरमध्ये पात्र होणार आहेत.