नवी दिल्ली - सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट आणत असतं. अनेक जण फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत असतात. फेसबुकवर अनेक फीचर आहेत मात्र फारच कमी युजर्सना याची माहिती आहे. फेसबुकवर फ्रेंड्स लिस्ट नावाचं एक फीचर असून या फीचरच्या मदतीने युजर्स आपल्याला हवी तशी नवी फ्रेंड लिस्ट तयार करू शकतात. फेसबुकवर वेगवेगळी फ्रेंड लिस्ट तयार करण्याचा पर्याय मिळते असल्याने हे फीचर युजर्ससाठी फायदेशीर आहे. युजर्सना त्यांच्या आवडीची फ्रेंड लिस्ट तयार करता येणार असल्याने चॅटिंगची गंमत वाढवणार आहे.
फेसबुकवर सर्वांना एकाच फ्रेंड लिस्टमध्ये ठेवण्याऐवजी फॅमिली, क्लोज फ्रेंड, स्कूल फ्रेंड, कॉलेज फ्रेंड, ऑफिस अशा वेगवेगळ्या लिस्ट तयार करता येतात. फेसबुकवर अनेक गोष्टी शेअर केल्या जातात. मात्र त्यापैकी काही फोटो हे फक्त आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तींसोबत शेअर करायचे असतात. त्यामुळे अशावेळी फ्रेंड लिस्ट फीचरचा खूप उपयोग होणार आहे. फेसबुकवर आधी पोस्ट शेअर करताना पब्लिक, फ्रेंड्स किंवा ओन्ली मीचा पर्याय असायचा. यापुढे या नव्या फिचरमुळे युजर्सना आपल्या पोस्ट फ्रेंड लिस्टप्रमाणे योग्य आणि आपल्याला हव्या असलेल्या लोकांसोबत शेअर करता येतील.
अशी बनवा नवी फ्रेंड लिस्ट
- सर्वप्रथम फेसबुक साईटवर जाऊन लॉग-इन करा.
- जर एखाद्या पीसी किंवा लॅपटॉपचा उपयोग करत असाल तर ते अधिक सोयीस्कर ठरेल.
- फेसबुक होमपेजवर मेन्यूमध्ये जाऊन ‘Friend Lists’ मेन्यूवर क्लिक करा.
- अधिक माहितीसाठी see more येथेही क्लिक करा. त्यानंतरच हा पर्याय उपलब्ध होईल.
- उजव्या बाजूला ‘+create list’ वर क्लिक करा.
- युजर्स हव्या असलेल्या नावाने लिस्ट तयार करू शकतात.
- ज्यांना त्या लिस्टमध्ये सामील करायचं आहे त्यांचं नाव लिहून सिलेक्ट करा. त्यानंतर 'create' वर क्लिक करा.
नव्या फ्रेंड लिस्टचा वापर असा करा
- फेसबुक लॉग-इन केल्यानंतर कोणताही फोटो किंवा पोस्ट शेअर करा.
- Privacy ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर युजर्सना Public, Friends सारखे काही ऑप्शन दिसतील.
- See more वर क्लिक करा.
- त्यानंतर Specific friends वर क्लिक करा आणि लिस्टचं नाव सर्च करा.
- ज्या लिस्टमध्ये तुम्हाला फोटो किंवा पोस्ट शेअर करायची आहे ती सिलेक्ट करा.
- फक्त त्या लिस्टमधील मेंबर्ससोबत युजर्स पोस्ट शेअर करू शकतात.
Facebook युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, जाणून घ्या कसंफेसबुकने युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी दिली आहे. मात्र यासाठी युजर्सना एक अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. फेसबुकने एक नवं रिसर्च अॅप आणलं आहे. 'स्टडी' असं या रिसर्च अॅपचं नाव असून फेसबुकने मंगळवारी (12 जून) याबाबत घोषणा केली. हे अॅप युजरचा फोन ट्रॅक करणार आहे. अॅप डाऊनलोड करताना युजर्सला त्यांच्या फोनमधील विविध अॅपचा ते किती वापर करता याची माहिती गोळा करण्याची परवानगी संबंधित रिसर्च अॅपला द्यावी लागणार आहे. यानंतर हे अॅप युजर्सच्या फोनला ट्रॅक करुन कोण कोणते अॅप किती वेळ वापरतो याची माहिती संकलित करणार आहे. फोन ट्रॅक करण्याची परवानगी देणाऱ्या युजर्सना फेसबुक पैसे देणार आहे. मात्र संबंधित अॅप केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले युजर्सच डाऊनलोड करू शकतात.
Facebook वर नवीन फीचर येणार, फेव्हरेट फ्रेंड टॉपवर राहणारसोशल मीडिया फेसबुक आपल्या 2 अब्ज 30 कोटी युजर्ससाठी न्यूज फीडमध्ये काही फेरबदल करणार आहे. या बदलानंतर लवकरच युजर्सना त्यांचे खास मित्र-मैत्रिणी त्यांच्या फीडमध्ये टॉपवर दिसणार आहेत. फेसबुकने यासाठी अनेक पोस्टचं सर्वेक्षण केलं आहे. युजर्सना नेमकं काय पाहायला आवडतं. याचा रिसर्च केला. फेसबुकने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सर्वेक्षणाच्या आधारे दोन रँकींग अपडेट करण्याची घोषणा केली आहे. युजर्सच्या आवडीच्या व्यक्तींना यामध्ये प्राधान्य देण्यात आलं असून फेसबुकवर ते टॉपमध्ये दिसणार आहेत. जर एका फोटोमध्ये टॅग केलं जात असेल तर किंवा एखाद्या पोस्टवर कमेंट येत असेल तर फेसबुक पॅटर्न दिसणार आहे. या सर्व गोष्टींचा वापर हा अल्गोरिदम ठरवण्यासाठी केला जाणार आहे.