मुंबई- फेसबुकवर करोडो युजर्सचा डेटा लिक केल्याचा आरोप केला जातो आहे. विशेष म्हणजे व्हॉट्सअॅपही युजर्सच्या डेटाला फेसबुकबरोबर शेअर करतं. पण आता व्हॉट्सअॅपमध्ये आलेल्या एका अपडेटमुळे युजर व्हॉट्सअॅपचा डेटा फेसबुकबरोबर शेअर करणं बंद करु शकतो.
अशा प्रकारे व्हॉट्सअॅपचा डेटा फेसबुकबरोबर शेअर करण्यापासून थांबवा- व्हॉट्सअॅप सुरू केल्यावर उजव्या बाजूला असणाऱ्या तीन डॉट्सवर टॅप करा.- त्यानंतर अनेक ऑप्शन सुरू होतील. त्यापैकी सेटिंग या ऑप्शनवर टॅप करा. - सेटिंगमध्ये येणाऱ्या ऑप्शनपैकी Account ऑप्शनवर टॅप करा. - अकाऊंटवर टॅप केल्यानंतर येणाऱ्या ऑप्शनपैकी 'चेक मार्क' या ऑप्शनवर क्लिक केल्यावर 'राइट ऑफ शेअर माय इन्फो' असं ऑप्शन येइल. त्या ऑप्शनला डिसेबल करा. यानंतर तुमचा व्हॉट्सअॅप डेटा फेसबुकबरोबर शेअर करणं बंद होईल.
तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मोबाइलवर व्हॉट्सअॅप इन्स्टॉल कराल तेव्हाच ही सेटिंग करु शकता. अॅप इन्स्टॉल करताना तुम्हाला अटी-नियमबद्दलच्या सहमतीसाठी विचारतील. त्यामध्ये तुम्हाला रीड मोअर करावं लागेल. त्यानंतर व्हॉट्सअॅप डेटा फेसबुकशी शेअर न करण्याच्या ऑप्शनवर जावं लागेल. एकदा ही सेटिंग केल्याने तुमचं अकाऊंट सुरक्षित राहिल.