HP नं अनोखा टॅबलेट पीसी लाँच केला आहे. यात 11 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे, परंतु यातील फ्लिपेबल कॅमेरा याची सर्वात मोठी खासियत आहे. कंपनीनं या टॅबलेटची घोषणा गेल्याच वर्षी केली होती. परंतु आता हा टॅबलेट पीसी यूएसमध्ये खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. ज्याची किंमत डिटॅचेबल कीबोर्डसह 599.99 डॉलर्स (जवळपास 45,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.
HP 11-inch Tablet PC ची वैशिष्ट्ये
नावाप्रमाणे यात 11-इंचाचा आयपीएस टचस्क्रीन डिस्प्ले मिळतो. ज्यात 2160×1440 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 400 निट्स पीक ब्राईटनेस देण्यात आली आहे. या टॅबला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा मिळते. हा टॅबलेट लेटेस्ट विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चलता चालतो. प्रोसेसिंगसाठी यात इंटेल पेंटियम सिल्वर N6000 क्वॉड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे, सोबत इंटेल यूएचडी ग्राफिक्स मिळतात. या प्रोसेसरला 4GB LPDDR4x रॅम आणि 128GB M.2 PCIe NVMe SSD स्टोरेजची जोड देण्यात आली आहे.
HP 11-inch Tablet PC मधील रोटेटिंग कॅमेरा याचा आकर्षण बिंदू म्हणता येईल. जो वेबकॅम आणि सेल्फी कॅमेराची भूमिका बजावतो. 13MP चा कॅमेरा तुम्ही तुमच्या गरजेनुसार फिरवू शकता. या टॅबमध्ये एक फिंगरप्रिंट रीडर आहे. कनेक्टिविटीसाठी यात एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, वाय-फाय 6 आणि ब्लूटूथ 5.0 मिळते. तसेच हा टॅब रिचार्जेबल टिल्ट पेन आणि डिटॅचेबल कीबोर्डला सपोर्ट करतो. या टॅबलेटमध्ये 30W पॉवर अडॅप्टरसह 32.2kWhr ची पॉलीमर बॅटरी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
4,500 रुपयांमध्ये घरी घेऊन या Samsung चा शानदार Smart TV; ऑफरसाठी उरले फक्त काही तास
स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...