एचपी पव्हिलीयन पॉवर मालिकेतील या तिन्ही नोटबुक मॉडेल्समध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत. हे सर्व टु-इन-वन या प्रकारातील आहेत. अर्थात ते लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणार आहे. या सर्व मॉडेल्समध्ये सातव्या पिढीतील अत्यंत गतीमान असे कोअर आय५/आय७ प्रोसेसर देण्यात आले आहेत. याच्या जोडीला ४ जीबी एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स १०५० ग्राफीक कार्डही असेल. तर उत्तम दर्जाच्या ध्वनीसाठी यात एचपी ऑडिओ बुस्टसह बी अँड ओ प्ले ही प्रणाली देण्यात आली आहे. यातील बॅटरी एचपीच्या फास्ट चार्ज तंत्रज्ञानाने सज्ज असून ती दीड तासात ९० टक्के चार्ज होत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
एचपी पव्हिलीयन पॉवर मालिकेतील सर्व मॉडेल्समध्ये १५.६ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स म्हणजे फुल हाय डेफिनेशन क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १२८ जीबी इतके एसएसडी तर एक टिबी इतके हार्ड डिस्कचे स्टोअरेज असेल. हे सर्व नोटबुक विंडोज १० प्रणालीवर चालणारे आहेत. यात युएसबी टाईप सी, युएसबी ३.१, एचडीएमआय, मायक्रो-एसडी कार्ड रीडर, हेडफोन जॅक आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच यात वाय-फाय कनेक्टिव्हिटीही असेल. या सर्व मॉडेल्समध्ये एमएस ऑफीस होम आणि एमएस ऑफीस स्टुडंट-२०१६ एडिशन प्रदान करण्यात आली आहे. यामुळे युजरला एमएस वर्ड, एमएस पॉवरपॉइंट, एमएस एक्सेल आणि एमएस वननोट आदी विविध टुल्स मोफत वापरता येतील.