शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

HP Chromebook 11a: लाईट गेली, बॅटरी संपली कारणे नकोत! HP चा 16 तासांचा बॅकअप देणारा स्वस्त लॅपटॉप लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 3:09 PM

HP Chromebook 11a launched: कोरोनाच्या लाटेमुळे सध्या भारतातच नाहीतर जगभरात जवळपास घरातूनच काम सुरु आहे. तसेच शाळकरी मुलांचे घरूनच शिक्षण सुरु आहे. अशावेळी मुलांना लॅपटॉप द्यायचा की काम करायचे असा प्रश्न पडतो.

कोरोनाच्या लाटेमुळे सध्या भारतातच नाहीतर जगभरात जवळपास घरातूनच काम (Work From Home) सुरु आहे. ज्यांना शक्य आहे ते घरातून तर ज्यांना शक्य नाही ते कंपनीत जाऊन काम करत आहेत. आता कोरोनाची दुसरी लाट आली असून पुन्हा घरातूनच काम करावे लागणार आहे. मुलेही घरातूनच शिक्षण (Education from Home) घेत आहेत. अशावेळी एचपी कंपनीने असा एक भन्नाट लॅपटॉप आणला आहे ज्याची बॅटरी तब्बल 16 तास चालणार आहे. (HP Chromebook 11a With MediaTek MT8183 Octa-Core Processor, Up to 16 Hour Battery Life Launched in India)

HP Chromebook 11a भारतात लाँच झाला आहे. हे क्रोमबुक खासकरून शाळकरी मुले म्हणजेच दुसरी ते सातवी इयत्तेतील मुलांसाठी बनविण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे हा लॅपटॉप अजिबात जड नाहीय. या लॅपटॉपचे वजन 1 किलो आहे. तसेत यामध्ये मीडियाटेक एमटी 8183 ऑक्टा-कोर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. 

या लॅपटॉपमध्ये व्हॉईस इनेबल्ड गुगल असिस्टंस आणि 1 वर्षासाठी गुगल वनचे फ्री सबस्क्रिप्शन देण्यात आले आहे. यामध्ये गुगल वनचे 100 जीबी क्लाऊड स्टोरेज आणि 1 वर्षासाठी गुगल एक्सपर्टचा अॅक्सेस व अन्य एक्सक्लुझिव्ह मेंबर बेनिफिट्स देण्यात येणार आहेत. हा लॅपटॉप क्रोम ओएसवर काम करतो. या डिव्हाईसमध्ये गुगल प्ले स्टोअरचा अॅक्सेस मिळतो. यामध्ये 11.6 इंचाचा एचडी (1,366x768 पिक्सल) आयपीएस टच डिस्प्ले देण्यात आला आहे. 

लॅपटॉपमध्ये मीडियाटेक MT8183 ऑक्टा कोअर चिपसेटसोबत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देणअयात आली आहे. ही स्टोरेज 256 जीबी पर्यंत वाढविण्यात येऊ शकते. HP Chromebook 11a मध्ये 37 WHr Li-Ion पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 16 तासांचा बॅकअप देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. युएसबी टाईप-ए आणि टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. 

कनेक्टिव्हीटीसाठी यामध्ये वायफाय 5 आणि ब्ल्यूटूथ व्हर्जन 5 देण्यात आले आहे. याची लांबी रुंदी 285x192.8x16.8 मीमी आहे. यामध्ये लेटेस्ट एचपी टू व्हिजन एचडी वेब कॅमेरा देण्यात आला आहे. या क्रोमबुकची किंमतही 21,999 ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :laptopलॅपटॉपcorona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षण