HP नं आपल्या भारतातील प्रिंटर्सच्या लाईनअपचा विस्तार करत LaserJet 1005, LaserJet 1020 आणि LaserJet 2606 असे तीन प्रिंटर्स सादर केले आहेत. हे प्रिंटर्स कमी किंमतीत उच्च दर्जाच्या प्रिंट्स देण्यासाठी बनवण्यात आले आहेत, असा दावा कंपनीनं केला आहे. हे प्रिंटर्स लघु आणि माध्यम दर्जाच्या उद्योगांची कार्यक्षमता वाढवतील, असं देखील कंपनीनं म्हटलं आहे.
सिंगल टँकमध्ये नवीन प्रिंटर्स 5000 पर्यंत पानं प्रिंट करू शकतात. तसेच सामान्य कार्टिजच्या तुलनेत यातून 5 पट जास्त टोनर पेज यिल्ड मिळेल. हे प्रिंटर्स एचपी टोनर रीलोड किटचा वापर करून सहज रिफील करता येतात. त्यामुळे युजर त्वरित टोनर कार्टिज रिफील करू शकतात.
किंमत
एचपी लेझरजेट टँक 1005w मॉडेलची किंमत 23,695 रुपये आहे. तर एचपी लेझरजेट टँक 1020 साठी 15,963 रुपये मोजावे लागतील. या लाईनअपमधील एचपी लेझरजेट टँक 2606 हा सर्वात महागडा मॉडेल आहे जो तुमि 29,558 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. हे तिनी मॉडेल एचपीच्या अधिकृत वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तसेच ऑफलाईन स्टोर्समधून देखील खरेदी करता येईल.
HP LaserJet 1005 आणि LaserJet 1020 चे फीचर्स
दोन्ही प्रिंटर्समध्ये 5000 पानांचा टोनर आधीपासूनच मिळतो. नवीन टोनरसाठी एचपी टोनर रीलोड किट 2500 आणि 5000 पानांच्या साईजमध्ये मिळते. अनेक पानांची कागदपत्र वेगानं प्रिंट करण्यासाठी यात टू साईड प्रिंटिंग देण्यात आली आहे. दोन्ही प्रिंटर्स वाय-फाय सपोर्टसह येतात आणि प्रिंटिंगसाठी स्कॅन आणि शेयरचा पर्याय देखील HP Smart अॅपमधून वापरता येतो.
HP LaserJet Tank 2606 चे फीचर्स
HP LaserJet Tank 2606 मध्ये डुप्लेक्स प्रिंटींगचा पर्याय देण्यात आला आहे. यात दोन्ही बाजूंना ऑटोमॅटिक प्रिंट करण्याची सोया आहे. एसडीडब्ल्यू व्हेरिएंटमध्ये 40 पानांचे ऑटोमॅटिक डॉक्युमेंट फीडर 250 पानांच्या पेज इनपूट ट्रेसह देण्यात आला आहे. यात देखील 5000 पानांचा टोनर आधीपासूनच मिळतो. तसेच हा प्रिंटर देखील एचपी टोनर रीलोड किटच्या इजी रिफीलला सपोर्ट करतो. ओरिजनल एचपी टोनर रिलोड किटमध्ये 75 टक्के कमी प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. प्रिंटर सोबत एचपी स्मार्ट अॅपमधून तुम्ही स्मार्ट अॅडव्हान्स स्कॅनिंग, प्रिंट, स्कॅन आणि शेअर करू शकता.