एचपीतर्फे आज त्यांचा नवा गेमिंग पोर्टफोलिओ सादर करण्यात आला. यात इंटेल कोअर १२ जेन आणि एएमडी रायझन ६००० सीरिज प्रोसेसर्ससह ओमेन १६, ओमेन १७ आणि विक्टस १५ आणि विक्टस १६ लॅपटॉप्स, ओमेन आणि विक्टस डेस्कटॉप्स आणि ओमेन गेमिंग हबमध्ये विविध दमदार अपग्रेड्सचा समावेश आहे. या अपग्रेड्समुळे अतुलनीय गेमिंग परफॉर्मन्स, प्रोफेशनल आणि कॅज्युअल गेमर्ससाठी दमदार गेमप्ले आहे. त्यामुळे त्यांना पूर्ण क्षमतेने खेळता येते आणि गेमचा आनंद घेता येतो. शाश्वत परिणाम साधण्याची एचपीची बांधिलकी जपत नव्या गेमिंग डिव्हाइसमधील सर्व घटक, अगदी स्टॅम्प्ड अॅल्युमिनिअम कव्हरही समुद्रात फेकण्यात आलेल्या पुनर्वापरयोग्य प्लास्टिकपासून बनवण्यात आले आहे.
ओमेन १६ मध्ये १६.१ इंची डिस्प्ले आणि १६:९ असा अस्पेक्ट रेशिओ आहे. त्यामुळे गेमर्सना अप्रतिम असा दृश्यानुभव मिळतो. तर, ओमेन १७ मधील १७.३ इंची स्क्रीनवरील मायक्रो-एज बेझल डिस्प्लेमुळे अधिक स्क्रिन-टू-चॅसिस रेशिओ मिळतो आणि जणू काही गेममध्ये गुंतून जाता येते. ओमेन उत्पादनांमध्ये अतुलनीय ताकदीसोबतच अतिरिक्त थर्मल आऊटलेट आणि हिट पाईप असल्याने कुलिंग उत्तम राहतं आणि जीपीयू आणि सीपीयूचा परफॉर्मन्सही वाढतो.
या पोर्टफोलिओमध्ये विक्टस १५ आणि १६ ही उत्पादनेही आहेत. विक्टस १५ मध्ये नेहमीचा बॅकलिट कीबोर्ड आणि परफॉर्मन्स ब्लू आणि मिका सिल्व्हर अशी रंगसंगीत आहे. विक्टस १६ मधील ओमेनच्या डीएनएमुळे खेळताना सुलभतेसोबतच अधिक चांगला गेमिंग अनुभव मिळतो. अद्वितीय असा प्रोसेसर आणि ग्राफिक्समुळे विक्टससोबत गेमर्सना गेमिंग, ब्राऊझिंग आणि एडिटिंग असं मल्टिटास्किंग करता येईल.
अतुलनीय अनुभव हवा असणाऱ्या गेमर्ससाठी खास तयार करण्यात आलेली नवी ओमेन आणि विक्टस डेस्कटॉप रेंज आज भारतात सादर होत आहे. एकसंध विस्तार, सहजसोपे अपग्रेड्स आणि जागतिक दर्जाचे थर्मल कुलिंग पर्याय यासोबतच एचपीचे पेटंट असलेले क्रायो चेंबर यामुळे गेमिंग डेस्कटॉप पीसीची ही नवी रेंज नव्या युगातील गेम्ससाठी सज्ज झाली आहे. या डेस्कटॉप्समध्ये १२ जनरेशनपर्यंतचे इंटेल कोअर i7-12700K प्रोसेसर्स आणि NVIDIA GeForce RTX 3080 तसेच GDDR6X १० जीबी आणि हायपरएक्स 32GB DDR4-3733 मेमरी, १ टीबी PCIe NVMe SSD, ८०० वॅटचा पॉवर सप्लाय आणि अधिक दणकट इंटरनर्ल्स आहेत.
गेमिंग डिव्हाइसमधील ओव्हरहिटिंगच्या समस्येबद्दल एचपी प्रचंड सजग आहे. एएए टायटल्सवर तासनतास गेमिंग करणाऱ्या गेमर्सना त्यांच्या लॅपटॉपवर चांगला गेमिंग परफॉर्मन्स हवा असतो आणि आपल्या सर्वोत्तम गेमिंग अनुभवात त्यांना कोणत्याही प्रकारची तडजोड नको असते. मात्र, सर्वोत्कृष्ट तांत्रिक वैशिष्ट्ये असूनही ओव्हरहिटिंगमुळे तुमचा हा आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो. कुलिंग ही गेमर्ससाठी आणखी एक चिंतेची बाब असते. शिवाय, लॅपटॉप खूप गरम होणे किंवा खूप आवाज होणे हे त्रासही असतात. म्हणूनच गेम ऑन विथ टेम्पेस्ट कुलिंग या आपल्या नव्या मोहिमेतून एचपी ओमेन १६ मधील थर्मल परिणामकारकतेविषयी माहिती देत आहे. ओमेन टेम्पेस्ट कुलिंग टेक्नॉलॉजीमध्ये ३ बाजूंनी वेंटिंग आणि ५ मार्गांनी एअरफ्लो दिलेला आहे. त्यामुळे लॅपटॉप थंड राहतो आणि तुम्हाला सहजसुंदर गेमिंग अनुभव मिळतो.
एचपी गेमिंग पोर्टफोलिओ
ओमेन १६ आणि ओमेन १७
- नव्या स्वरुपातील थर्मल्स: अतिरिक्त पाचवा हीट पाईप आणि चौथा आऊटफ्लो वेंट असल्याने जीपीयू हिंजमध्ये ३ टक्क्यांनी आणि बॉटम एसएसडी तापमानात १४ टक्क्यांनी घट होते. त्याचप्रमाणे, या आधीच्या उत्पादनांच्या तुलनेत ही नवी उत्पादने ५ टक्के कमी आवाजात[ii] काम करतात त्यामुळे गेमर्सना झेन आऊट करून सहज त्यांच्या आवडत्या टायटल्समध्ये गुंतून जाता येईल.
- प्रोसेसर्सची सुसंगत कामगिरी: बिल्ट-इन आयआर थर्मोपाइल सेन्सरच्या साथीने ओमेन गेमिंग हबमधील ओमेन डायनॅमिक पॉवर अगदी सहज आणि अचूक सीपीयू आणि जीपीयू क्षमता जोखू शकतो आणि या दोन्हीमध्ये दमदारपणे पॉवर देऊ करतो. यामुळे अतिरिक्त हेडरूम मिळते आणि चालू गेम अॅक्टिव्हिटीनुसार इन-गेम एफपीएस कमाल क्षमतेला नेते. त्यामुळे कोणत्याही गेममध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट अनुभव मिळतो. या तंत्रज्ञानामुळे 3D मार्क टाइम स्पाय[iii] च्या परफॉर्मन्समध्ये १८ टक्के वाढ झाली आहे आणि मागील वर्षीच्या मॉडेलच्या तुलनेत सीपीयू परफॉर्मन्समध्ये ३६ टक्के वाढ झाली आहे.
- उच्च परफॉर्मन्स: यातील आकर्षक ग्राफिक्स आणि NVIDIA® GeForce® RTX™ 3070 Ti Laptop GPU/ RTX™ 3080 Ti लॅपटॉप जीपीयू आणि अत्याधुनिक मॅक्स क्यू तंत्रज्ञान किंवा एएमडी रायझन आरएक्स 6650M मुळे नवे गेम्स टायटल्सही जणू तुमच्यासमोर प्रत्यक्षात अवतरतात. शिवाय यात 32GB DDR5 4800 MHz पर्यंत अपग्रेड उपलब्ध आहे आणि 2TB PCIe Gen4x4 SSD पर्यंत महत्त्वाच्या फाइल्सचा वेगवान अॅक्सेस घेता येत असल्याने मेमरीवरही भार येत नाही.
- गुंतवून ठेवणारे व्हिज्युअल्स: यातील QHD[iv] 165Hz IPS पॅनल सह 3ms चा रिस्पॉन्स टाईम आणि १०० टक्के sRGB यामुळे स्क्रीनवरील अॅक्शन जणू काही तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवता येते. यातील आयसेफ® डिस्प्ले सर्टिफिकेशन[v]सह कमी तीव्रतेच्या ब्लू लाइटचा अनुभव घेता येईल आणि यातील ऑटो ब्राइटनेस सेन्सरमुळे स्क्रीनवरील भव्य अॅडव्हेंचर पाहतानाही डोळ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. यातील आकर्षक व्हिज्युअल्स आरबीजी पर्यंतच्या लायटिंगमुळे कीबोर्डवरही अनुभवता येतील. कोणत्याही गेमिंग सेटअप संकल्पनेनुसार योग्य लुक मिळवण्यासाठी यात ओमेन गेमिंग हब लाईट स्टुडिओ इंटिग्रेशनही आहे.
व्हिक्टस १५
- डिस्प्ले : ओमेनची प्रेरणा असलेले नवे अधिक सुंदर १५.६ इंची डिस्प्लेचे डिझाइन, अभिजात सौंदर्यासाठी गोलाकार कडा
- व्हिडीओचा दर्जा: टेम्पोरल नॉईज रिडक्शन (TNR) मुळे आवाज करणारे घटक शोधून साफ केले जातात, त्यामुळे सुस्पष्ट, लो लाइट दर्जाचा दृश्यानुभव मिळतो, यात सुपर रिझोल्युशन ऑटो सीन सेटिंग आहेत
- दमदार प्रोसेसर: १२ जने इंटेल i7/i5 प्रोसेसर आणि NVIDIA RTX 3050Ti ग्राफिक्समुळे गेमिंग किंवा मल्टिटास्किंगसाठी उत्कृष्ट कम्प्युटिंग पॉवर मिळते.
व्हिक्टस १६
- कॉम्पॅक्ट पॉवर: यातील १६.१ इंची डिस्प्लेमध्ये FHD 144 Hz पर्यंतचे पर्याय आणि आयसेफ® लो ब्लू लाइट असल्याने दैनंदिन स्वरुपावर उपयुक्त ठरणारी पोर्टेबिलिटी मिळते. AMD Ryzen™ 7 6800H सह NVIDIA® GeForce RTX™ 3050Ti लॅपटॉप जीपीयूमुळे ग्राफिक्स इतके दमदार होतात की त्यांचा इतका वेग तुम्ही यापूर्वी कधीच अनुभवला नसेल. विद्युत वेगाने आणि प्रतिसादात्मक स्वरुपावरील गेमप्लेसह 32 GB DDR5-4800 MHz पर्यंतच्या मेमरीचे पर्याय यात आहेत.
- अनोखे डिझाइन: अनोखे लाइफस्टाइल डिझाइन आणि त्यातील आकर्षक रंगसंगती तसेच ओमेन डिव्हाइसवर असतात तसे संस्मरणीय फाँट प्रिंट असलेले बॅकलिट कीबोर्ड आणि एकात्मिक ओसीसी, पॉवर बटन, कॅलक्युलेटर क्विक कीज.
- आतून गारेगार: बाहेरच्या बाजूला असलेले रूंद वेंट्स याच्या दृश्य सौंदर्यात भर घालतात. शिवाय, यातील तापमान परिणामकारकतेला चार ठिकाणी असलेले एअरफ्लो आणि दोन हीट पाइपच्या डिझाइनची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे गेमप्लेच्या उत्साहाचा पारा चढत असताना तुमचे डिव्हाईस मात्र गारच राहील. यातील 512 GB PCIe® NVMe™ TLC पर्यंतच्या सिंगल एसएसडी स्टोरेजमुळे गेमिंग आणि इतर अॅक्टिव्हिटीज फारच वेगवान आणि सोप्या होतात.
ओमेन 45L, 40L आणि 25L डेस्कटॉप्स
- दमदार परफॉर्मन्स: ओमेन 45L, 40L आणि 25L डेस्कटॉप्समध्ये i7-12700K 12 Cores पर्यंतची इंटेलची ताकद आहे. तसेच 45L साठी NVIDIA GeForce RTX 3080 10GB पर्यंतचे ग्राफिक्स आणि 40L साठी HyperX 32GB (2x16GB) DDR4 3733 XMP RGB देण्यात आले आहे. त्यामुळे, गेमप्ले अगदी सहजसुंदर अनुभव ठरतो.
- ओमेन क्रायो चेंबर: ओमेन 45L मधील पेटंट असलेले नाविन्यपूर्ण कुलिंग तंत्रज्ञान सिस्टमध्ये सुयोग्य तापमान राखण्यासाठी हवा खेळती ठेवते. यातील पंख्यांचे सुयोग्य स्थान आणि रचना यामुळे तुमचा गेममधील उत्साह वाढला तरी ओव्हरहिटिंग कमी होतं.
- ब्युटी मीट्स द बीस्ट: या डिव्हाइसमधील टेम्पर्ड ग्लास पॅनल्स, पूर्ण मेटलची बॉडी, टूल फ्री एंट्रन्स आणि संपूर्ण आरजीबी कंट्रोल यामुळे हे डिव्हाइस दिसायलाही अतिशय देखणं आहे.
- अधिक सुयोग्य आणि वैयक्तिक रचना: यातील सहजसोपे तंत्रज्ञान वापरकर्त्यांना ओमेन गेमिंग हबसह सर्व प्रकारची लहानमोठी वैशिष्ट्ये, इंटेलिजंट ओव्हक्लॉकिंग असो की एसडब्ल्यूवर आधारित फॅन कंट्रोल, बीआयओएस अॅक्सेस, रॅमची वारंवारता आणि आरजीबी जाणून घेण्यात साह्य करते.
व्हिक्टस 15L डेस्कटॉप्स
- वेगवान आणि विश्वासार्ह: व्हिक्टस 15L मध्ये इंटेल i7- 12700F 12 CORES आणि NVIDIA GeForce RTX 3060 Ti 8GB किंवा एएमडी रायझन 7 5700G 8 CORES ची ताकद आहे. त्यामुळे सहजसोपा आणि सुंदर गेमप्ले तसेच इतर अनुभव मिळतात.
- उत्कृष्ट गेमिंग डिझाइन: डेस्कटॉप पीसीची ही नवी उत्पादने प्रत्येक जीवनशैलीसाठी साजेशी आहेत. यात कॉम्पॅक्ट फूटप्रिंट आणि वैयक्तिक स्वरुपातील आरजीबी लोगो असल्याने एक अनोख्या जीवनशैलीची ओळख या डिव्हाइसला मिळाली आहे.
- अपग्रेड करण्यातील लवचिकता: डेस्कटॉप पीसीमधील या नव्या उत्पादनांमध्ये व्यापक कस्टमायझेशनला वाव आहे. त्यामुळे वापरकर्त्यांचा गेमिंग अनुभव अधिक समृद्ध होतो.
अप्रितम नियंत्रण
या रेंजमधील सर्व डिव्हाइसमध्ये ओमेन गेमिंग हब प्रीइन्स्टॉल आहे. त्यामुळे परफॉर्मन्स मोड, नेटवर्क बुस्टर आणि सिस्टम वायटल्स अशा दमदार अंतर्गत वैशिष्ट्यांचा लाभ घेऊन गेम अधिक सहजसुंदररित्या खेळता येतो. यातील नव्या ऑप्टिमायझर सुविधेमुळे वापरकर्त्यांना सिस्टम रिसोर्सेस मोकळे करता येतात त्यामुळे हा अनुभव अधिकच समृद्ध बनतो. तसेच, यातील लो लेव्हल ओएस सेटिंगमध्ये बदल करून एफपीएस कमाल मर्यादेला आणतो येतो… मग तुमचा पीसी ओमेन, व्हिक्टस, कस्टम बिल्ट किंवा इतर कोणताही असो. इतकंच नाही, गॅलरी, रिवॉर्ड्स, ओअॅसिस लाइव्ह आणि ओमेन लाइट स्टुडिओ सह ट्विंकली लायटिंगचा सपोर्ट अशा अतिरिक्त सुविधांच्या उपलब्धतेमुळे तुमचा गेमिंगचा अनुभव अतुलनीय पातळीवर पोहोचतो.
किंमत आणि उपलब्धता
उत्पादन | किंमत आणि उपलब्धता |
ओमेन १६ | शॅडो ब्लॅक रंगात उपलब्ध, किंमत १०९९९९ रु. पासून सुरू |
ओमेन १७ | किंमत १९९९९९ रु. पासून सुरू, ऑगस्ट २०२२ पासून उपलब्ध होणार |
व्हिक्टस १५ | किंमत ६७९९९ रु. पासून सुरू, जुलै २०२२ पासून उपलब्ध होणार |
व्हिक्टस १६ | ८४९९९ रु.पासून उपलब्ध |
ओमेन 45L, 40L आणि 25L डेस्कटॉप्स | १४९९९९ रु.पासून उपलब्ध |
व्हिक्टस 15L डेस्कटॉप | ९३९९९ रु.पासून उपलब्ध |