एचपीनं (HP) भारतीय बाजारपेठेत दोन नवीन लॅपटॉप सीरिज लाँच केल्या आहेत. यामध्ये एचपी Pavilion x360 आणि HP Pavilion Plus सीरिजचा समावेश करण्यात आलाय. HP च्या इन सीरीज लॅपटॉपमध्ये HP 15 (2023), एचपी पॅव्हिलियन x360 (2023) आणि एचपी पॅव्हिलियन प्लस 14 (2023) यांचा समावेश आहे. या लॅपटॉपमध्ये हलकी बॉडी आणि सहज वापराचा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. एचपी पॅव्हिलियन x360 मॉडेल 360 डिग्री हिंजसह येतात.
याशिवाय या लॅपटॉपमध्ये 12व्या आणि 13व्या जनरेशन इंटेल कोअर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. पॅव्हिलियन प्लस 14 आणि एचपी पॅव्हिलियन x360 मध्ये मॅन्युअल कॅमेरा शटर देण्यात आलेय. HP 14 आणि HP 15 लॅपटॉपमध्ये लॉग-इनसाठी फिंगरप्रिंट रीडरही देण्यात आलाय. हे सर्व लॅपटॉप तयार करण्यासाठी ओशन बाउंड प्लास्टिक आणि पोस्ट-कझ्युमर रिसायकल प्लास्टिकचा वापर करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय.
पॅव्हिलियन प्लस 14 आणि पॅव्हिलियन एक्स 360 चे फीचर्स
- 400 निट ब्राईटनेससोबत क्लिअर व्हिज्युअलसाठी आयसेफ प्रमाणित आणि ओएलईडी डिस्प्ले
- उत्तम मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी मल्टी टच
- उत्तम प्रोडक्टिव्हिटीसाठी 13 व्या जनरेशनचा इंटेल कोअर प्रोसेसर आणि डीडीआर 5 रॅम
- टेम्परल नॉईस रिडक्शन आणि एआय नॉईस रिडक्शनसह हाय रिझॉल्युशन एचपी टू व्हिजन 5 मेगापिक्सेल कॅमेरा.
- प्रायव्हसीसाठी मॅन्युअर कॅमेरा सेटअप
- उत्तम मल्टीटास्किंगसाठी मल्टीपल पोर्ट ऑप्शन
एचपी 14 आणि एचपी 15 चे फीचर्स
- एचपी 14 चं वजन 1.4 किलो आणि एचपी 15 चं वजन 1.6 किलो आहे. त्यामुळे पोर्टेबलिटी सोपी होते.
- प्रायव्हसीसाठी मॅन्युअल शटर डोअर
- जलद कनेक्टिव्हीटीसाठी वायफाय 6
- उत्तम व्हिडीओ आणि साऊंड क्वालिटीसाठी टेम्परल नॉईस रिडक्शन आणि एएआय नॉईस रिमुव्हलसह एफएचडी कॅमेरा
किती आहे किंमत?
- एचपी 14 लॅपटॉपची किंमत 39,999 रुपयांपासून सुरू होते.
- तर एचपी पॅव्हिलियन एक्सची किंमत 57,999 रुपयांपासून सुरू होते आणि एचपी पॅव्हिलियन प्लस 14 ची किंमत 81,999 रुपयांपासून सुरू होते.