नवी दिल्ली : सेल्फीची क्रेझ असलेल्या तरुणाईला आपल्याकडे वळविण्यासाठी मोबाईल कंपन्या काय काय करतील याचा नेम नाही. काही कंपन्यांनी 13 मेगापिक्सलपासून तब्बल 24 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरे दिले आहेत. मात्र, या खेचाखेचीच्या स्पर्धेत याच स्मार्ट तरुणाईला मूर्ख बनविण्याचे धंदेही या कंपन्या करताना दिसत आहेत.
Huawei या कंपनीने नुकताच Nova 3 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. याच्या जाहिरातीमध्ये या फोनच्या कॅमेरॅतून कसा एकदम नितळ, सुंदर सेल्फी काढता येतो याचा दावाही या कंपनीने केला आहे. मात्र, हा सेल्फी काढण्यासाठी कंपनीने नोव्हा 3 या फोनचा नव्हे तर चक्क डीएसएलआर या उच्च प्रतीच्या कॅमेऱ्याचा वापर केला आहे. या जाहिरातीमध्ये दिसणाऱ्या मॉडेलने चुकुन पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे हुवाई या कंपनीचे बिंग फुटले आहे.
यापूर्वीही कंपनीकडून फसवणूकया कंपनीने यापूर्वीही कंपनीने ग्राहकांची अशीच फसवणूक केली होती. P9 या स्मार्टफोनची जाहिरात करताना एक कॅमेरा क्वालिटी दाखविणारा फोटो गुगल प्लसवर टाकला होता. मात्र, हा फोटो Canon E)S 5D Mark III या उच्च दर्जाच्या डीएसएलआरद्वारे काढल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर कंपनीने माफीही मागितली होती.