Huawei ने गेल्यावर्षी चीनमध्ये Huawei Nova 8 आणि Huawei Nova 8 Pro असे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. आता यातील बेस मॉडेल कंपनीने जागतिक बाजारात सादर केला आहे. हुवावे नोवा 8 स्मार्टफोन Kirin 985 चिपसेटसह रशियात दाखल झाला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतासह इतर बाजारपेठांमध्ये देखील उपलब्ध होऊ शकतो.
Huawei Nova 8 Global Edition चे स्पेक्स
हुवावे नोवा 8 ग्लोबल एडिशनच्या डिजाईनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. या स्मार्टफोनमध्ये 6.57 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले कंपनीने दिल आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये ऑक्टकोर प्रोसेसरसह किरीन 820ई चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. हा अँड्रॉइड 11 आधारित ईएमयुआय 12 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी हुवावे नोवा 8 ग्लोबल एडिशनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेसर आहे. तसेच हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 3,800एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 66W हुवावे सुपरचार्ज रॅपिड चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. रशियात हा फोन RUB 39,999 म्हणजे 40,000 रुपयांच्या आसपास विकत घेता येईल.