Huawei नं आपला नवीन स्मार्ट एयर प्युरिफायर चीनमध्ये सादर केला आहे. कंपनीनं अपग्रेडेड टेक्नॉलजीसह Smart Selection 720 Full-Effect Air Purifier 2 लाँच केला आहे. या सीरिजमधील जुना Air Purifier 1S चार वर्षांपूर्वी अर्थात 2018 मध्ये सादर करण्यात आला होता. नवीन मॉडेलमध्ये सुधारित प्यूरिफिकेशन कॅपॅसिटी आणि स्मार्ट कंट्रोल फीचर्स देण्यात आले आहेत.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Gizmochina च्या रिपोर्टनुसार, Huawei Smart Selection 720 Full-Effect Air Purifier 2 मध्ये कंपनीने अल्ट्रा क्लीन फुल इफेक्ट प्यूरिफिकेशन टेक्नॉलॉजी दिली आहे. ही टेक्नॉलजी मशीनच्या आत आणि बाहेर 6 प्यूरिफिकेशन सायकल पूर्ण करते. त्यामुळे 99.99% पर्यंतची शुद्धता मिळते आणि हवेतील व्हायरस नष्ट होतो.
हा एयर प्यूरिफायर HarmonyOS ला देखील सपोर्ट त्यामुळे स्मार्टफोनवरील अॅप्सच्या मदतीनं हा कंट्रोल करता येतो. यासाठी Huawei Smart Life App, Xiaoyi वॉयस कंट्रोल आणि स्मार्ट होम सीन लिंकेज इत्यादीचा वापर करता येतो.
किंमत
Smart Selection 720 Full-Effect Air Purifier 2 ची किंमत 1599 युआन (जवळपास 18,700 रुपये) ठेवण्यात आली आहे. परंतु प्री-ऑर्डरवरील 100 युआनच्या का डिस्काउंटनंतर हा प्युरिफायर 1499 युआन (जवळपास 17,500 रुपये) मध्ये विकत घेता येईल. हा एयर प्यूरिफायर सध्या चीनमध्ये आला आहे, परंतु याच्या भारतीय लाँचची कोणतीही माहिती मिळाली नाही.
हे देखील वाचा:
ठरलं तर! ‘या’ तारखेला येणार Apple चा सर्वात स्वस्त 5G iPhone; नवीन iPad आणि Mac देखील होणार लाँच
यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट