Huawei Tri foldable Smartphone : स्मार्टफोनचे क्षेत्र असे आहे, ज्यात दररोज नवनवीन डिझाईन आणि फीचर्स असलेले फोन्स येत राहतात. गेल्या काही वर्षांपासून बाजारात विविध प्रकारच्या डिझाईनचे फोन्स आले आहेत. यामध्ये फोल्डेबल फोन्स सर्वाधिक लोकप्रिय झाले. पण, आता यामध्येही एक मोठा बदल होणार आहे. चीनमधील आघाडीची स्मार्टफोन मेकर कंपनी Huawei ने तीनवेळा फोल्ड होणारा स्मार्टफोन आणण्याची तयारी केली आहे.
सध्या बाजारात जवळपास सर्वच कंपन्यांचे फोल्डेबल फोन्स उपलब्ध आहेत. नुकताच Google ने आपला दुसरा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Samsung चे फोल्डेबल फोन तर ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. आता फोल्डेबल फोनच्या तंत्रज्ञानात चीनी कंपनी Huawei एक पाऊल पुढे गेली आहे. Huawei तीन वेळा फोल्ड होणारा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा जगातील पहिला ट्रिपल फोल्डिंग स्मार्टफोन असेल.
कधी लॉन्च होणार? सीईओंनी सांगितलेमीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या ग्राहक व्यवसाय विभागाचे सीईओ रिचर्ड यू यांच्याकडे हा ट्रिपल फोल्डेबल फोन पाहण्यात आला आहे. याशिवाय, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी या फोनबद्दल माहिती दिली हीती. कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने त्यांना या फोनच्या लॉन्चिंगबाबत विचारले, त्यावर त्यांनी, पुढच्या महिन्यात फोन लॉन्च होईल, असे सांगितले. मात्र, अध्याप कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
huawei ट्राय-फोल्ड स्मार्टफोनफोनबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही, परंतु सोशल मीडियावर याच्या स्पेसिफीकेशनबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. या फोनमध्ये 10-इंच स्क्रीन असण्याची अपेक्षा आहे, जी टॅबलेटच्या आकाराची असेल. म्हणजेच, हा फोन पूर्णपणे अनफोल्ड केल्यानंतर टॅब्लेटसारखा दिसेल.