हुआवे कंपनीचा ब्रँड असणार्या ऑनरने भारतात आपला ऑनर हॉली ४ हा स्मार्टफोन ११,९९९ रूपये मूल्यात बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
ऑनर हॉली ४ हा स्मार्टफोन ग्रे, गोल्ड आणि सिल्व्हर या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना देशभरातील शॉपीजमधून ऑफलाईन पध्दतीत उपलब्ध करण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये पीडीएएफ आणि एलईडी फ्लॅशयुक्त १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य कॅमेरा असेल. यात प्रो व्हिडीओ, प्रो पिक्चर, टाईमलॅप्स, स्लो-मोशन आदी फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ऑनर हॉली ४ हे मॉडेल अँड्रॉडइच्या नोगट ७.१ या आवृत्तीवर आधारित असणार्या इएमयुआय ५.१ प्रणालीवर चालणारा असेल. तर यातील बॅटरी ३०२० मिलीअँपिअर क्षमतेची असेल.
ऑनर हॉली ४ या स्मार्टफोनमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात क्वॉड-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.