OnePlus सध्या जुन्या स्मार्टफोन्सचा स्टॉक संपवण्याच्या कामाला लागली आहे. वनप्लस 10 प्रो भारताचं येताच कंपनीनं जुन्या वनप्लस 9 सीरिजच्या किंमतीत कपात केली आहे. त्यामुळे 12GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 48MP कॅमेरा, 4500mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग असलेला OnePlus 9 खूप स्वस्तात उपलब्ध झाला आहे. जर तुम्ही फ्लॅगशिप अनुभव देणारा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर या संधीचा लाभ घेऊ शकता.
OnePlus 9 5G ची किंमत आणि ऑफर
OnePlus 9 5G च्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत 49,999 रुपये आहे. परंतु कंपनीनं या स्मार्टफोनच्या किंमतीत 9,500 रुपयांची केली आहे. त्यामुळे हा डिवाइस 40,599 रुपयांमध्ये वनप्लसच्या वेबसाईटवर उपलब्ध झाला हे. तसेच तुमच्यकडे एसबीआयचं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही आणखी 5000 रुपयांची बचत करू शकता. म्हणजे फक्त 35 हजारांमध्ये तुम्ही वनप्लसचा फ्लॅगशिप मिळू शकतो. ही ऑफर Amazon वर देखील उपलब्ध आहे.
OnePlus 9 5G चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 9 5G मध्ये कंपनीनं 6.55 इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 3D गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह येतो. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे. डिवाइस Andriod 11 आधारित वनप्लस ऑक्सीजन ओएस 11 वर चालतो. यात 12GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे.
OnePlus 9 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या स्मार्टफोनचा मेन कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय यात 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेलची मोनोक्रोम लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी यात 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.