अमेरिकन कंपनी Hubsan ने आपला नवीन ड्रोन बाजारात उतरवला आहे. हा एक Compact Drone असून कंपनीने याचे नाव Zino Mini असे ठेवले आहे. फक्त नावाने नव्हे तर आकाराने देखील हा डिवाइस मिनी आहे. याचा अंदाज 249 ग्राम वजनावरून लावता येतो. ड्रोन कॅमेऱ्याचा प्रसार करण्यासाठी 'Let More People Fly' या टॅगलाइनसह हा डिवाइस सादर केला आहे.
Hubsan Zino Mini Price
Zino Mini अजूनतरी विक्रीसाठी उपलब्ध झाला नाही. परंतु या ड्रोनची किंमत 459 डॉलरपासून सुरु होते. ही किंमत 34,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा ड्रोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. लवकरच हा ड्रोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. परंतु भारतातील ड्रोन पॉलिसीमुळे हा डिवाइस देशात इम्पोर्ट करता येणार नाही.
Hubsan Zino Mini स्पेसिफिकेशन्स
Zino Mini मध्ये 1/1.3 इंचाचा CMOS कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. जो 30 fps वर 4K रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहे. एखाद्या सबजेक्टला फॉलो करताना कायम फ्रेममध्ये ठेवण्यासाठी या ड्रोनमध्ये AI ट्रॅकिंग मोड देण्यात आला आहे. तसेच यातील नाईट टाइम मोड कमी प्रकाशात देखील चांगलं रेकॉर्डिंग करू शकतो.
कंपनीने ड्रोनचे दोन स्टोरेज व्हेरिएंट सदर केले आहेत. 64GB आणि 128GB इंटरनल स्टोरेजचा समावेश आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता देखील येते. Zino Mini ड्रोन मधील 3000mAh बॅटरी म्हणजे या डिवाइसचा महत्वाचा भाग आहे. जी फुल चार्ज केल्यास हा ड्रोन 40 मिनिटे किंवा 10 किलोमीटरपर्यंत उडवता येतो, असा दावा कंपनीने केला आहे.