स्मार्टफोनसह अन्य उपकरणे आणि अॅसेसरीजच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणार्या आयबॉलने अलीकडच्या काळात संगणकीय उपकरणांवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने काँपबुक एईआर ३ आणि स्लाईड पेनबुक हे मॉडेल्स सादर केले होते. यात आता काँपबुक एक्झेम्पलेअर प्लस या मॉडेलची भर पडणार आहे. वर नमूद केल्यानुसार हा लॅपटॉप विंडोज १० प्रणालीवर चालणारा असेल. यात तब्बल १०,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे हा लॅपटॉप एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ८.५ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर यातून १९ दिवसांचा स्टँडबाय टाईम मिळत असल्याचेही आयबॉलने नमूद केले आहे. तर यात अतिशय दर्जेदार असे ड्युअल स्पीकर असल्याने सुश्राव्य ध्वनीची अनुभूती घेता येते. याचा कि-बोर्ड हा चिकलेट स्टाईलचा असून विविध फंक्शन्ससाठी टचपॅड देण्यात आले आहे.
उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, आयबॉल काँपबुक एक्झेम्पलेअर प्लस या मॉडेलमध्ये १४ इंच आकारमानाचा आणि एचडी (१३६६ बाय ७६८ पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले असेल. क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोअरेज १२८ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. तर यात १ टेराबाईटपर्यंत हार्ड डिस्क ड्राईव्ह वापरण्यासाठी स्लॉटही देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी आयबॉल काँपबुक एक्झेम्पलेअर प्लस या मॉडेलमध्ये युएसबी, एचडीएमआय, मिनी एचडीएमआय, वाय-फाय, ब्ल्यु-टुथ आदी फिचर्स असतील. हे मॉडेल ग्राहकांना १६,४९९ रूपये मूल्यात विविध शॉपींग पोर्टल्सवरून खरेदी करता येणार आहे.