नेटफ्लिक्सच्या (Netflix) सबस्क्रायबर्संच्या संख्येत गेल्या १० वर्षांमध्ये पहिल्यांदा मोठी घसरण दिसून आली. २०२२ च्या पहिल्या तिमाहित ग्राहकांच्या संख्येत २ लाखांपेक्षा जास्त ग्राहक कमी झाले. इलॉन मस्क यांचा कंपनीच्या नफा आणि तोट्याशी थेट संबंध नसला तरी नेटफ्लिक्सचे युझर्स कमी झाल्यावरून त्यांनी कंपनीची शाळाच घेतली होती. तसंच त्यांनी नेटफ्लिक्स ‘वोक माईंड व्हायरस’ (Woke Mind Virus) मानसिकतेनं ग्रस्त असल्याचं संबोधलं होतं. यावेळी नेटफ्लिक्सवरील कन्टेन्ट पाहण्याजोगा नसल्याचंही ते म्हणाले होतं. इलॉन मस्क यांनी कंपनीला ओरिजिनल मुव्ही आणि शो तयार करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, आता मस्क यांनी पुन्हा ट्वीट करत कंपनीचं कौतुक केलं आहे.
जर आपल्या कन्टेंन्टशी सहमत नसतील तर कर्मचारी कंपनी सोडू शकतात अशी ताकीद नेटफ्लिक्सनं दिली. यावर आता टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी कौतुक करत हे उचलण्यात आलेलं चांगलं पाऊल असल्याचं म्हटलं आहे. नेटफ्लिक्सने आपल्या कल्चरल गाइडलाइन्स अपडेट केली आहेत आणि "कलात्मक अभिव्यक्ती" नावाचा एक विभाग जोडला आहे. तो लॅटफॉर्म अनेक प्रेक्षकांसाठी प्रोग्रामिंग कसा ऑफर करतो याबद्दल तपशीलवार माहिती देत असल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात सांगण्यात आलं आहे. नेटफ्लिक्सनंच ठरवण्यापेक्षा प्रेक्षांना त्यांच्यासाठी काय योग्य आहे ठेरवू दे, असं नेटफ्लिक्सनं म्हटलं आहे. यापूर्वी नेटफ्लिक्सवर संताप व्यक्त करणाऱ्या मस्क यांनी आता नेटफ्लिक्सनं केलेल्या नव्या बदलाचं स्वागत केलं आहे. ‘गुड मुव्ह बाय नेटफ्लिक्स’ असं ट्वीट इलॉन मस्क यांनी केलं आहे.
काय आहे वोक माइंड?वोकचा अर्थ वांशिक भेदभावाशी निगडीत आहे. मस्क यांच्या मते नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्म याबाबत काही अधिकच संवेदनशील झाला आहे. यामुळे त्यांच्याकडे वांशिक भेदभावाशिवाय आणखी कोणताही कन्टेंन्ट उपलब्ध नाही. यापूर्वी एका समुदायानं वोक या शब्दाचा वापरक वांशिक भेदभावाच्या विरोधात केला होता. इलॉन मस्क यांनीदेखील याला वोक माईंड व्हायरस असं नाव दिलं आहे.