WhatsApp : काही दिवसापूर्वी अनेकांचे व्हॉट्सअॅप हॅक झाल्याची माहिती समोर आली होते. तुमच्या व्हॉट्सअॅप सुरक्षेबाबत तुम्ही सतर्क राहणे महत्वाचे आहे. अनेकवेळा व्हॉट्स अॅप हॅक झाल्यानंतरही, लोकांना त्याबद्दल थेट माहिती मिळत नाही. जर तुमचे व्हॉट्सअॅप हॅक झाले तर तुमच्या स्क्रिनवर काही साईन येतात. या साईनमुळे तुम्हाला तुमचे अॅप हॅक झालंयकी नाही याची माहिती मिळते.
आधी नकार दिला, आता Google ने खरेदी केली 'ही' कंपनी; तब्बल $32 अब्जांचा करार...
असामान्य अॅक्टिव्हिटी :
तुमच्या नकळत संदेश पाठवणे.
प्रोफाइल फोटो किंवा स्टेट्समध्ये बदल.
अज्ञात ग्रुपमध्ये सामील होणे.
लिंक केलेली डिव्हाइस:
अज्ञात उपकरणांवरील अॅक्टिव्हीटीची WhatsApp सूचना.
'लिंक्ड डिव्हाइसेस' सेटिंग्जमध्ये अज्ञात डिव्हाइसेस दिसतात.
लॉगिन प्रोब्लेम
अचानक खात्यातून लॉग आउट होणे.
न मागता व्हेरिफिकेशन कोड मिळणे.
जर तुमच्या खात्यावरुन मित्रांकडे पैसे मागितले तर ते तुमचे खाते हॅक झाल्याचे लक्षण आहे.
हॅकर्सना खात्यात प्रवेश कसा मिळतो?
जर कोणी तुमच्या फोनचा अॅक्सेस मिळवला आणि व्हॉट्सअॅप वेब क्यूआर कोड स्कॅन केला तर ते तुमच्या चॅट्सचे दूरस्थपणे निरीक्षण करू शकतात.
फिशिंग हल्ले: संशयास्पद लिंक्सवर क्लिक केल्याने किंवा बनावट व्हॉट्सअॅप अॅप्स डाउनलोड केल्याने तुमचा डेटा धोक्यात येऊ शकतो.
सिम स्वॅप हल्ला: हॅकर्स तुमच्या मोबाइल प्रदात्याला तुमचा नंबर त्यांच्या सिम कार्डमध्ये ट्रान्सफर करण्यास फसवू शकतात.
स्पायवेअर किंवा मालवेअर: जर तुमच्या फोनवर मॅलिशियस सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले असेल तर ते तुमच् अॅक्टिव्हिटीला ट्रॅक करते.