आजच्या काळात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. पण जर फोन हरवला किंवा चोरीला गेला तर अनेक समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची, टेन्शन घेण्याची गरज नाही कारण काही सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन स्वतः शोधू शकता आणि तेही पोलिसांच्या मदतीशिवाय...
Google Find My Device वापरून शोधा लोकेशन
जर तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमच्या गुगल अकाउंटमध्ये लॉग इन केलं असेल, तर तुम्ही Find My Device फीचर वापरून फोनचे रिअल-टाइम लोकेशन तपासू शकता. यासाठी तुम्हाला फक्त दुसऱ्या फोन किंवा कम्पूटरवर https://www.google.com/android/find ही वेबसाईट उघडावी लागेल किंवा त्याचे अॅप तुमच्या मोबाइलवर डाउनलोड करावं लागेल.
तुमच्या गुगल आयडीने येथे लॉगिन करा आणि काही सेकंदात तुम्हाला तुमचा फोन कुठे आहे हे कळेल. या काळात फोनमध्ये इंटरनेट आणि लोकेशन चालू असलं पाहिजे. जर हरवलेल्या फोनचं इंटरनेट आणि लोकेशन चालू असेल, तर तुम्ही फोन लॉक करू शकता किंवा तो सायलेंटवर असला तरीही रिंग वाजू शकते.
CEIR पोर्टलवरुन फोन करा ब्लॉक
जर तुमचा फोन चोरीला गेला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी त्याचा गैरवापर करू शकतं, तर तुम्ही भारत सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर तक्रार दाखल करू शकता.
हे पोर्टल फोनला त्याच्या IMEI नंबरच्या आधारे ब्लॉक करतं. म्हणजे, जर कोणताही चोर तुमच्या फोनमध्ये कोणतेही सिम घालण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांना त्याची माहिती मिळू शकते.
फोन ब्लॉक करण्यासाठी
- CEIR पोर्टल - https://www.ceir.gov.in/ वर जा.
- 'Block Stolen/Lost Mobile' हा ऑप्शन निवडा.
- FIR कॉपी आणि आयडी कार्ड अपलोड करा.
- IMEI नंबर एंटर करा आणि सबमिट करा.
एकदा फोन सापडला की, तो या पोर्टलवरून अनब्लॉक देखील करता येतो.
ईमेलद्वारे फोन ट्रेस करणं देखील शक्य
जर तुमच्याकडे दुसऱ्या डिव्हाइसवर तुमच्या फोनमध्ये लॉग इन केलेला ईमेल असेल, तर तुम्ही त्याच ईमेलचा वापर करून फोनचं लोकेशन तपासू शकता. गुगल लोकेशन हिस्ट्री आणि अकाउंट एक्टिव्हिटी मधूनही फोनचे शेवटचं लोकेशन काढता येतं. फक्त तुमच्या ईमेल अकाऊंटमध्ये लॉग इन करा आणि गुगल मॅप्स लोकेशन टाइमलाइन पाहा.
जर तुमचा फोन हरवला तर सर्वप्रथम घाबरू नका. वर नमूद केलेल्या कोणत्याही किंवा तीन पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमचा स्मार्टफोन परत मिळवू शकता. तसेच, भविष्यासाठी तुमच्या फोनचे लोकेशन नेहमी ऑन असल्याची आणि तुमचे गुगल अकाउंट एक्टिव्ह असल्याची खात्री करा. या सोप्या युक्त्यांसह, तुम्ही तुमचा फोन शोधू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला पोलिसांकडे जाण्याचीही गरज भासणार नाही.