प्राची सोनवणेइंटरनेटच्या विश्वात गुगलला एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले असून अनेकांना गुगल आणि इंटरनेटशिवाय जगण्याची कल्पना करणेही शक्य नाही. गुगल मॅप हे गुगलमधील सर्वाधिक वापरल्या जाणा-या फिचर्सपैकी एक होय. गुगल मॅपचा वापर एखाद्या ठरावीक ठिकाणी जाण्यासाठी बहुतांश लोक करतात. गुगल आपल्या युजर्सला गुगल मॅपच्या साहाय्याने सलग अपडेट्स देत असतो. जर अज्ञातस्थळी रस्ता भटकले असाल तर तुम्ही गुगल मॅपच्या मदतीने योग्य ठिकाणी पोहोचू शकता. काही ट्रिक्सचा वापर अचूकरीत्या केला तर त्याच्या मदतीने गुगल मॅप आणखीन चांगल्या प्रकारे वापरु शकता आणि त्याचबरोबर गुगल मॅपसोबत मिळून पैसेही कमाविण्याची संधीही आता उपलब्ध झालेली आहे. नेटवर्क किंवा इंटरनेट नसतानाही गुगल मॅप वापरु शकता.तुम्ही तुमच्या घरचा पत्ता, आॅफिसचा पत्ता किंवा नातेवाइकांचा पत्ताही गुगल मॅपवर अॅड करू शकता. तुम्ही यामुळे वारंवार रस्ता चुकू शकत नाही. यामुळे नेव्हिगेशनमध्येही खूप मदत होते. तुमचा एखादा मित्र जर तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे, त्याला तुमचे लोकेशन शोधण्यात अडथळा येत आहे. तेव्हा तुम्ही लोकेशनदेखील शेअर करू शकता.तुम्ही आपल्या आवडत्या दुकानांत, मॉल्समध्ये जर वारंवार जात असाल तर ही ठिकाणे तुम्ही आपल्या मॅपवर सेव्ह करू शकता. यामुळे नेव्हिगेशनमध्ये कुठलाच अडथळा तुम्हाला येत नाही. तुम्ही या मॅपचा वापर तुमचा प्रवास सुखकर करण्यासाठी करू शकता. गुगल मॅप आणखीन चांगले बनविण्यासाठी जर तुम्ही मदत कराल तर गुगल त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे देते. यासाठी आसपासच्या जागा, लोकेशनची माहिती गुगल मॅपवर योग्य पद्धतीने द्यावी लागणार आहे.दुचाकीस्वारांसाठी शॉर्टकटरस्त्यावरून गाडी चालवताना वाहतूककोंडीसारख्या समस्येमुळे वाहनधारकांना रोजच अडचणींचा सामना करावा लागतो. महामार्गावर चारचाकी गाड्यांची रस्त्यांवर रांगच रांग लागली असताना दुचाकीवाले मात्र मिळणाºया अगदी कमी जागेतून पुढे पुढे जाताना दिसतात. गुगलच्या नव्या टू-व्हीलर मॅप अॅपमुळे दुचाकीस्वारांना ट्राफिकमधून वाट काढण्याला एक सोपा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.असे आहे या अॅपचे कामलवकरच हे अप लाँच होणार असून, जे लोक दुचाकीवरून लांबचा प्रवास करतात किंवा अगदी किचकट आणि गजबजलेल्या परिसरातून दुचाकी चालवतात, अशा लोकांसाठी हे अॅप अत्यंत महत्त्वाची कामगिरी करणार आहे. आपण थांबलेल्या ठिकाणापासून आपल्याला पोहोचायचे असलेल्या निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी गुगलचे हे टू-व्हीलर मॅप अॅप मार्गदर्शन करणार आहे.
गुगल मॅपचा वाढता वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 2:53 AM