शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हॅकर्सच्या निशाण्यावर भारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 11:42 AM

भारत सध्या जगभरातील हॅकर्ससाठीदेखील ‘कमाईचा मोठा स्रोत’ होऊन बसला आहे!

- प्रसाद ताम्हनकर‘आयबीएम’ ह्या जगप्रसिद्ध कंपनीच्या ‘एक्स-फोर्स थ्रेट’ अहवालानुसार आशिया प्रांतात जपाननंतर सर्वाधिक सायबर हल्ल्यांचा शिकार झालेला देश भारत आहे. २०२० साली आशियात झालेल्या एकूण सायबर हल्ल्यांपैकी ७% हल्ले हे एकट्या भारतावर करण्यात आले. प्रसिद्ध उत्पादनांचा नकली माल गळ्यात मारून,  डाटा लीक करण्याची धमकी देऊन अनेक भारतीयांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आला.  सगळ्यात जास्ती, म्हणजे ६०% हल्ले हे फायनान्स आणि इन्शुरन्स क्षेत्रातील कंपन्यांवर करण्यात आले. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवाक्षेत्राचा नंबर आहे.

भारतावर करण्यात आलेल्या एकूण हल्ल्यांपैकी ४०% हल्ले हे ‘रॅन्समवेअर’द्वारे करण्यात आले आहेत. ह्यात युजर्सचा संगणक लॉक करून अथवा डाटा एन्क्रिप्टेड करून तो सोडण्यासाठी खंडणीची मागणी करण्यात येते. अन्यथा डाटा लीक करण्याची धमकी  देण्यात येते. २०२० सालात ‘सोदिनोकिबी (Sodinokibi)’ ह्या अत्यंत घातकी मानल्या जाणाऱ्या हॅकर्स ग्रुपने सर्वाधिक धुमाकूळ घातला. गतसालातले २२% हल्ले हे ह्या एकट्या हॅकर्स ग्रुपने केलेले आहेत.

सोदिनोकिबी गटाने जगभरातील  निरपराध लोकांना लक्ष्य करून, त्यांचा २१.६ टीबी येवढा प्रचंड डाटा चोरला. ह्या पीडितांपैकी २/३ लोकांनी खंडणी देऊन आपल्या डाटाची सुटका करून घेतली, तर ४३% डाटा ह्या गटाकडून लीक करण्यात आला.  आयबीएमच्या अहवालानुसार, सोदिनोकिबीने गतसाली जगभरातून खंडणीपोटी ८९० कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. जुलै महिन्यात भारतावर सगळ्यात जास्ती सायबर हल्ले करण्यात आले. गूगल, पे-पालपासून ते आदिदासपर्यंत अनेक जगप्रसिद्ध ब्रॅण्डसची हुबेहूब नक्कल करीत हॅकर्सनी अनेक भारतीयांना गंडा घातला.

भविष्यात क्लाऊड सर्व्हिसेस वापरणे अनिवार्य होईल. या सर्व्हिसेसवरती हल्ले होण्याची शक्यताही  बळावेल. सर्वच कंपन्यांनी ‘कॉन्फिडेन्शल कॉम्प्युटिंग’सारख्या तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त वापर सुरक्षित राहण्यासाठी करण्याची गरज असल्याचेदेखील ह्या अहवालात सांगितले आहे. ह्या तंत्रज्ञानात डाटा प्रोसेस होत असतानाच ‘इन्क्रिप्ट’ केला जात असल्याने, तो अधिक सुरक्षित राहतो.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमIndiaभारतchinaचीनtechnologyतंत्रज्ञान