शहरं
Join us  
Trending Stories
1
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
2
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
3
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
4
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
5
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
6
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
7
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
8
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
9
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
10
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
11
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
12
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
13
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
14
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
15
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
16
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
17
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
18
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
19
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
20
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...

भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 6:50 PM

6G in India: भारतात 6G तंत्रज्ञान आणण्याबाबत जोरदार तयारी सुरू आहे. इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 मध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही माहिती दिली.

6G in India : सर्वात वेगवान 5G रोलआउटनंतर भारतात 6G ची तयारी सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या 8 व्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 6G तंत्रज्ञानाबाबत मोठे भाष्य केले. सरकारने दावा केला की, भारत 6G टेक्नॉलॉजी आणण्यात संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल. 6G तंत्रज्ञान आणणारा पहिला देश आपण व्हावे, अशी पंतप्रधान मोदींची इच्छा आहे.

भारत 6G चे नेतृत्व करेलइंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) द्वारे आयोजित WTSA मध्ये केंद्रीय मंत्री सिंधियांनी भारतातील 6G च्या शक्यतांबद्दल स्पष्टपणे भाष्य केले. ते म्हणाले की, भारत 5G आणि 4G मध्ये आघाडीवर आहे आणि आता 6G मध्येही आघाडीवर असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे आम्ही पालन करत आहोत. 6G ची सुरुवात करणारा भारत पहिला देश व्हावा, अशी पंतप्रधान मोदींची इच्छा आहे.

दूरसंचार क्षेत्रातील समस्या दूर होतीलयादरम्यान केंद्रीय मंत्री असेही म्हणाले की, भारतातील 6G प्रत्येकासाठी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असायला हवे. आपला देश इंडिया 6G अलायन्ससोबत 10 टक्के पेटंट मिळवेल. यामुळेच 6G चे मार्केट लीडर होण्यासाठी दूरसंचार कायदा, 2023 मध्ये बदल करण्यात आले आहेत. भारतातील दूरसंचार क्षेत्रातील समस्या सोडवण्याचा सरकार विचार करत आहे. दरम्यान, यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एअरटेलच्या सॅटेलाइट कम्युनिकेशनचा वापर करून दुर्गम भागात तैनात असलेल्या सैनिकांशी व्हिडिओ कॉलही केला.

सॅटेलाईट कम्युनिकेशन येणार?भारतात लवकरच सॅटेलाइट कम्युनिकेशन लॉन्च केले जाऊ शकते. सरकार सायबर सुरक्षेवर भर देत असून डिजिटल कम्युनिकेशनमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले जात आहे. भारतातील दूरसंचार क्षेत्र खूप वेगाने वाढत आहे. आगामी काळात संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. सरकारच्या या प्रयत्नांमुळे Airtel, BSNL, Jio, Vodafone-Idea युजर्सना 6G ची भेट सर्वप्रथम मिळेल, असेही सिंधिया यावेळी म्हणाले.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनAirtelएअरटेलJioजिओVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)BSNLबीएसएनएल