सध्या भारतीय डेटिंग अॅप्स मार्केटमध्ये जबरदस्त लोकप्रिय होताना दिसत आहेत. अनेक नवीन डेटिंग अॅप्स वेगवेगळ्या लोकांना टार्गेट करत असून Tinder, Bumble, OkCupid, Hinge यांसारख्या अॅप्सना टक्कर देत आहेत. या भारतीय अॅप्सवर रोजच्या रोज नवनवे युजर्स जोडले जात आहेत. देशाच्या संस्कृतीतील बारकावे लक्षात घेत हे भारतीय अॅप्स तयार करण्यात आले आहेत. यात कोलकाता बेस्ड Flutrr, एडोर, रिकिंडल, LGBTQ+ पासून ते Quack Quack पर्यंत सामील आहेत. तर जाणून घेऊयात या ऐप्सची खासियत...
यात कोलकाता बेस्ड Flutrr अॅपसंदर्भात बोलायचे झाल्यास, या अॅपने गेल्या आठवड्यात डाऊनलोड करण्याच्या बाबतीत 500,000 चा टप्पा पार केला असून ते भारतातील छोट्या शहरांना टार्गेट करत आहे. या अॅपचा दावा आहे की, हे 450 मिलियन डॉलरचे मार्केट आहे. या अॅपमध्ये 12 इंडियन लँग्वेजसाठी रिअल-टाईम, इन-चॅट आणि इन-अॅप ट्रान्सलेशनचीही व्यवस्था आहे.
एडोर -हे अॅप सिंगल लोकांसाटी एक समान हॉबी, इनट्रेस्ट आणि पॅशन शेअर करणाऱ्या लोकांसोबत कनेक्ट होणे सोपे बनवते. अॅपच्या प्ले स्टोअरवर 70,000 हून अधिक डाउनलोड्स आहे. तसेच हे अॅप यूजर्सना आपली लोकॅलिटी आणि म्युचूअल पॅशन असलेल्या लोकांना भेटवते. आपल्याला यात एकूण 15 पॅशन कॅटेगिरी मिळतात. यात फिटनेस, म्यूझिक, डान्स, स्पोर्ट्स, योगासन, मेडिटेशन सारख्या कॅटगिरीजचा समावेश होतो.
रिकिंडल -देशात 2018 मध्ये जवळपास 5.5 कोटी विडोज होत्या. दर वर्षी होणाऱ्या खटस्फोटांचे प्रमाण 1.7 टक्क्यांच्या जवळपास आहे. रिकिंडल अॅप दर वर्षी जवळपास किमान 4 मिलियन लोकांच्या मार्केटवर लक्ष ठेवते.
डेटिंग अॅप LGBTQ+ आणि Quack Quack -LGBTQ+ या डेटिंग अॅपमध्ये लोकांना सेम जंडरचे लोक शोधण्याचा पर्याय मिळतो. या अॅपच्या प्ले स्टोअरवर 100,000 हून अधिक डाउनलोड आहेत. तसेच Quack Quack अॅपवर 23 मिलियन हून अधिक रजिस्टर्ड यूजर्स आहेत. तसेच या अॅपवर जवळपास 25,000 नवे यूजर्स रोज जोडले जातात.