मोठ्या टेक कंपन्या चांगली सेवा देण्यासाठी बग बाउंटी प्रोग्राम चालवतात. या प्रोग्राममधून त्यांच्या सॉफ्टवेयर, अॅप्स आणि सर्विसेजमधील दोष शोधणाऱ्या लोकांना बक्षिसं दिली जातात. गुगलचा देखील असाच एक प्रोग्राम आहे. गेल्यावर्षी वेगवेगळ्या सर्विसेजमध्ये बग रिपोर्ट करणाऱ्या रिसर्चर्सना गुगलनं 87 लाख डॉलर अर्थात 65 कोटी रुपयाचं पेमेंट केलं आहे.
कंपनीनं आपल्या रिपोर्टमध्ये भारतीय रिसर्चर अमन पांडेय यांचा खास उल्लेख केला आहे. ते बग्समिरर कंपनीचे संस्थापक आहेत. गुगलच्या रिपोर्टनुसार ते बग बाउंटी प्रोग्राममध्ये गेल्यावर्षी टॉपला रिसर्चरर होते. त्यांनी गेल्यावर्षी गुगलकडे 232 बग रिपोर्ट केले होते. 2019 पासून आतापर्यंत 280 पेक्षा जास्त बग्स रिपोर्ट करण्याचं काम त्यांनी केलं आहे.
अमन पांडेय यांनी NIT Bhopal मधून ग्रॅज्युएशन केला आहे. ते बग्समिरर या कंपनीचे संस्थापक आणि CEO आहेत. 2021 मध्ये त्यांनी या कंपनीची नोंदणी केली आहे परंतु 2019 पासूनच ते बग्स रिपोर्ट करण्याचं काम करत आहेत.
हे देखील वाचा: