जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ घरूनच काम केल्यानंतर आता सगळी कार्यालये पुन्हा पूर्ण क्षमतेने काम करण्यास सज्ज होत असल्याने देशभरात जोमाने त्यासाठीची तयारी सुरू आहे. ऑफिस डेस्कसाठी अॅक्सेसरीज, नाश्त्याचे आरोग्यदायी पदार्थ आणि वर्क सप्लाइज अशा अनेक वस्तूंची खरेदी करत सगळीकडेच नागरिक पुन्हा कार्यालयांमध्ये जाण्यासाठी उत्साहाने तयारी करत आहेत. सजग ग्राहक घराबाहेर पडताना पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने जात आहेत. अशावेळी फ्लिपकार्ट या भारतीय ईकॉमर्स ब्रँडने काही रंजक ट्रेंड्स नमूद केले आहेत. यातून भारतीय ग्राहकांची सध्याची मन:स्थिती लक्षात येते.
बराच काळ घरातूनच काम केल्यानंतर आता बदललेल्या परिस्थितीत पुन्हा एकदा घराबाहेर पडावे लागणार असल्याने फ्लिपकार्टवर ऑटो आणि होम या विभागांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. ऑटोमोबाइल विभागात, विशेषत: दुचाकी विभागातील उत्पादनांच्या खरेदीत वाढ दिसून आली आहे. यात ग्लव्ह्स, आर्म स्लीव्ह्स आणि टायर पम्प्स अशा रायडिंग गीअर उत्पादनांचा समावेश आहे. चारचाकी वाहनांच्या विभागात गाडी धुण्याचे कपडे, एअर फ्रेशनर, कार पॉलिश, स्क्रॅच रिमुव्हर वॅक्स, कार शॅम्पू आणि कार व्हॅक्युम क्लीनर्स अशा स्वच्छतेच्या उत्पादनांसोबतच इतर उत्पादनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आज, गाडीच्या सजावटीच्या वस्तूंमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. यात कार स्टीकर्स, हँगिंग ऑर्नामेंट्स आणि डॅशबोर्डवरील वस्तूंचा समावेश आहे. ऑटोमोबाइल विभागातील बहुतांश मागणी देशातील उत्तर आणि दक्षिण झोनमधील ग्राहकांकडून आहे.
नागरिक पुन्हा कार्यालयांमध्ये जाण्यास सुरुवात होत असताना आणखी एका विभागात लक्षणीय वाढ दिसून आली आहे आणि तो म्हणजे होम इम्प्रूव्हमेंट. डेस्क ऑर्गनायझर्स, मिल्टन, सेलो आणि टपरवेअरसारख्या ब्रँड्सचे लंच बॉक्स, पाण्याच्या बाटल्या अशा उत्पादनांनी मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ अनुभवली. नागरिकांच्या आरोग्य आणि वेलनेसमधील सजगतेमुळे यूव्ही ब्लॉकिंग असलेल्या विंडो शेड्स आणि रोलरच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. पर्यावरणात बदल होत असताना स्वत:ची काळजी घेण्यास ग्राहक प्राधान्य देत आहेत, हे यातून स्पष्ट होते.
जागतिक महामारीमुळे स्वत:ची काळजी घेण्याचं महत्त्व आपल्याला कळलं. आता पुन्हा कार्यालयांमध्ये जातानाही ग्राहक आपल्या वेलबीइंगला महत्त्व देत आहेत. ग्राहकांच्या दमदार गरजा हेरून त्यांना या बदलाला सामोरे जाताना साह्य करण्यासाठी व्यापक उत्पादने उपलब्ध करून देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न फ्लिपकार्ट करत आहे.