कमी किंमतीत चांगले फीचर्स देण्यासाठी Infinix कंपनी ओळखली जाते. असाच एक स्मार्टफोन इनफिनिक्सने एप्रिलमध्ये भारतात लाँच केला होता. कंपनीने लो बजेट Infinix Hot 10 Play स्मार्टफोन 6,000mAh बॅटरी आणि 4GB रॅमसह भारतात लाँच केला होता. आज कंपनीने या फोनचा अजून एक स्वस्त व्हेरिएंट भारतात लाँच केला आहे. कंपनीने Infinix Hot 10 Play स्मार्टफोनचा 3GB रॅम + 32GB स्टोरेज व्हेरिएंट 7,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे.
Infinix Hot 10 Play ची किंमत
Infinix Hot 10 Play चे दोन व्हेरिएंट आता भारतात उपलब्ध झाले आहेत. यातील नवीन 3GB रॅम + 32GB स्टोरेज व्हेरिएंट कंपनीने 7,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे, जो 21 जुलैपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. त्याचबरोबर 4GB रॅम 64GB स्टोरेज व्हेरिएंट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Infinix Hot 10 Play चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Hot 10 Play स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.82 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक Helio G35 चिपसेट देण्यात आला आहे. हा इनफिनिक्स फोन अँड्रॉइड 10 वर चालतो. या फोनमध्ये 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो, सोबत एक डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Infinix Hot 10 Play मध्ये पावर बॅकअपसाठी 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.