Infinix भारतात लवकरच Hot 11 सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा हा स्मार्टफोन Infinix Hot 11 2022 नावानं लाँच केला जाईल. आता या स्वस्त स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. Infinix Hot 11 2022 स्मार्टफोन UniSoC T700 प्रोसेसर, 4GB RAM, 48MP Camera आणि 5,000mAh ची बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.
Infinix Hot 11 2022 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Infinix Hot 11 2022 स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा Full HD+ LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले पंच डिजाईनसह सादर केला जाईल आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. या इनफिनिक्स स्मार्टफोनला UniSoC T700 प्रोसेसर आणि Mali G52 GPU ची पॉवर मिळेल. सोबत 4GB रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेजसह दिली जाऊ शकते.
Infinix Hot 11 2022 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. ज्यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP ची मॅक्रो लेन्स मिळेल. फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. यातील 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह सादर केली जाऊ शकते. Infinix Hot 11 2022 स्मार्टफोन भारतात 10,999 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा:
Flipkart Sale: 28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर