लवकरच भारतीय स्मार्टफोन बाजारातील लो बजेट सेगमेंटमध्ये मोठी हालचाल आहे. चिनी कंपनी शाओमी लवकरच आपला Redmi 10 Prime स्मार्टफोन सादर करणार आहे. या फोनमध्ये जो चिपसेट असेल त्याच चिपसेटसह हॉंगकॉंगमधील स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix देखील स्मार्टफोन सादर करणार आहे. हा फोन Infinix Hot सीरीजमध्ये नवीन फोन सप्टेंबरच्या मध्यात Infinix Hot 11S नावाने लाँच होईल.
Infinix Hot 11S
Infinix कंपनीने या स्मार्टफोनच्या नावाची आणि चिपसेटची माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये MediaTek Helio G88 चिपसेट देण्यात येईल. कंपनीच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे हा स्मार्टफोन देखील बजेट कॅटेगरीमध्ये सादर केला जाईल. कंपनीचा इतिहास पाहता इनफिनिक्स हॉट 11एस मध्ये कमी किंमतीत देखील मोठी बॅटरी आणि मोठी स्क्रीन असेल.
नुकत्याच लाँच झालेल्या Infinix 5A चे स्पेसिफिकेशन्स
Infinix 5A स्मार्टफोनमध्ये कंपनीने 1560×720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.52 इंचाचा एचडी+ एलसीडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा अस्पेक्ट रेशियो 20:9 आणि स्क्रीन टू बॉडी रेशियो 90.5% आहे. स्मार्टफोनमध्ये कंपनीने MediaTek Helio A20 प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ही मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येते.
Infinix 5A मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. हा एक 8MP Dual AI रियर कॅमेरा आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅश देखील मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा स्वस्त स्मार्टफोन Android 11 आधारित Android GO ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. सुरक्षेच्या दृष्टीने या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर मिळते. Infinix 5A मध्ये कंपनीने 5000mAh ची बॅटरी दिली आहे.