शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

30 हजारांपेक्षा कमी किंमतीत शानदार फीचर्स; Infinix INBook X1 Slim लॅपटॉपची भारतात एंट्री

By सिद्धेश जाधव | Published: June 15, 2022 2:19 PM

Infinix INBook X1 Slim लॅपटॉप भारतीयांच्या भेटीला 10th Gen Intel Core प्रोसेसरसह आला आहे.  

Infinix INBook X1 Slim लॅपटॉप भारतात लाँच करण्यात आला आहे. या सेगमेंटमधील सर्वात पातळ आणि हलका लॅपटॉप असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या लॅपटॉपचे पाच व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. ज्यात 10th Gen Intel Core प्रोसेसर, 16GB पर्यंत RAM, 512GB पर्यंत स्टोरेज आणि Windows 11 ओएस मिळतो.  

Infinix Inbook X1 Slim Specifications 

या लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा फुलएचडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1,920×1,080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या डिस्प्लेचा अस्पेक्ट रेश्यो 16:9 आणि पीक ब्राईटनेस 300 निट्स आहे. इनफिनिक्सच्या या लॅपटॉपमध्ये बॅकलिट चिकलेट कीबोर्ड देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी लॅपटॉपमध्ये ड्युअल बँड Wi-Fi 802.11 ab/b/g/n/ac, Bluetooth v5.1, दोन USB Type-C पोर्ट, दोन USB 3.0 पोर्ट, HDMI 4.1 पोर्ट, SD कार्ड स्लॉट आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.  

Infinix Inbook X1 Slim चे पाच मॉडेल सादर करण्यात आले आहेत. यात Intel Core i3-1005G1 प्रोसेसर, Intel Core i5-1035G1 आणि Intel Core i7-1065G7 प्रोसेसरचा समावेश करण्यात आला आहे. हे लॅपटॉप 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत M.2 NVMe PCIe 3. स्टोरेजसह विकत घेता येतील. Infinix InBook X1 Slim मध्ये लेटेस्ट Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळेल. तसेच या लॅपटॉपमध्ये 50Wh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W चार्जला सपोर्ट करते. ही बॅटरी 11 तास वेब ब्राउजिंगला सपोर्ट करते.  

Infinix Inbook X1 Slim ची किंमत 

  • Infinix Inbook X1 Slim Core i3 8GB/256GB: 29,990 रुपये 
  • Infinix Inbook X1 Slim Core i3 8GB/512GB: 32,990 रुपये 
  • Infinix Inbook X1 Slim Core i5 8GB/512GB: 39,990 रुपये  
  • Infinix Inbook X1 Slim Core i5 16GB/512GB: 44990 रुपये 
  • Infinix Inbook X1 Slim Core i7 16GB/512GB: 49,990 रुपये 

हे लॅपटॉप्स Axis बँक ऑफर अंतगर्त डिस्काउंटसह विकत घेता येतील. कंपनीनं Cosmic Blue, Noble Red, Starfall Grey आणि Aurora Green कलर व्हेरिएंट सादर केले आहेत. 

टॅग्स :laptopलॅपटॉप