काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि Infinix आपल्या 160W चार्जिंग सपोर्ट असलेल्या फोनवर काम करत आहे. त्यानंतर या फोनचे रेंडर्स देखील समोर आले होते. आता इनफिनिक्सने अधिकृतपणे सांगितले आहे कि कंपनी भारतात आपला 160 वॉट चार्जिंग सपोर्ट असलेला फोन सादर करणार आहे. Infinix इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून हि माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये एका फोनसोबत 160W चार्जिंग सपोर्ट दाखवण्यात आला आहे. हा फोन भारतात कधी लाँच होईल याची माहिती मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. आशा आहे कि लवकरच हि माहिती देखील समोर येईल.
Infinix India ने केलेल्या ट्वीटमधील फोनचे नाव समजले नाही. परंतु, हा एक कर्व डिस्प्ले असलेला फोन आहे. काही दिवसांपूर्वी लीक झालेल्या रेंडर्समध्ये देखील कर्व डिस्प्ले दिसला होता. इनफिनिक्सचा हा फोन 4,000mAh ची बॅटरी फक्त 10 मिनिटांत फुल चार्ज करू शकतो, असा अंदाज लावला जात आहे.
काही दिवसांपूर्वी आलेल्या डिजाइन रेंडरर्सनुसार, हा एक प्रीमियम फोन असू शकतो. यात बेजललेस डिजाइन असलेला कर्व डिस्प्ले आहे. फोनमधील डिस्प्लेच्या वरच्या आणि खालच्या बाजूस देखील खूप कमी बेजल दिसत आहेत. यात वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात होल-पंच कॅमेरा कटआउट आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. खालच्या बाजूला स्पीकर ग्रिल आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. पावर आणि वॉल्यूम बटन्स उजवीकडे देण्यात आले आहेत.
इनफिनिक्सच्या या फोनच्या मागे मोठ्या अक्षरांत ‘नाऊ’ अशी ब्रॅंडिंग आहे. त्याचबरोबर एक आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आहे. या मॉड्यूलमध्ये मोठे कॅमेरा तीन कॅमेरे आणि एक एलईडी फ्लॅश दिसत आहे. या आगामी फोनचे नाव काय असेल याची माहिती मात्र समोर आली नाही, तसेच किंमत किती असेल हे देखील आता सांगता येणार नाही.