मुंबई : इंफिनिक्सने ‘स्मार्ट 3 प्लस’ हा नवीन फोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. महत्वाचे म्हणजे या फोनची किंमत 7 हजा रुपये ठेवण्य़ात आली आहे. उद्यापासून हा फोन केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. स्मार्ट 3 प्लसमध्ये लो लाईट सेन्सरअसलेला ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये अँड्रॉईड पाय ही अद्ययावत ओएस देण्य़ात आली आहे. हा फोन मिडनाइट ब्लॅक आणि सफायर स्यान या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल.
स्मार्ट 3 प्लसमध्ये १३ एमपीसह दोन दोन एम पी रिअर कॅमेरा देण्यात आले आहेत. तसेच 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही आहे. ६.२१ इंचाचा एचडी प्लस ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आलेला आहे. 3500 एमएएचची बॅटरी आहे. या फोनचे वजन 148 ग्रॅम ठेवण्यात आले आहे. तसेच सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आले आहे. गेम खेळणाऱ्यांसाठी या फोनमध्ये बूस्ट फिचर देण्यात आले आहे.