शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

Infinix चा बजेट फ्रेंडली लॅपटॉप आणि स्मार्टफोन सीरिज लवकरच होणार भारतात लाँच; कंपनीने दिली माहिती  

By सिद्धेश जाधव | Published: November 02, 2021 5:35 PM

Infinix Note 11 Pro India Launch Price: Infinix INBook X1 लॅपटॉप आणि Infinix Note 11 series चे स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

Infinix Note 11 Pro India Launch Price: Infinix ने काही दिवसांपूर्वी Infinix INBook X1 लॅपटॉप आणि Infinix Note 11 series चे स्मार्टफोन जागतिक बाजारात उतरवले होते. आता हे डिवाइस कंपनी डिसेंबरमध्ये भारतात सादर करणार आहे, याची माहिती कंपनीने दिली आहे. Infinix INBook X1 लॅपटॉप कंपनीचा पहिला लॅपटॉप आहे, तर Infinix Note 11 series जुन्या Infinix Note 10 series ची जागा घेईल.  

Infinix INBook X1 चे स्पेसिफिकेशन्स 

Infinix INBook X1 हा कंपनीचा पहिला लॅपटॉप आहे. जो Noble Red, Starfull Grey, आणि Aurora Green कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो. हे लॅपटॉप Intel Core i3, i5, आणि i7 प्रोसेसरसह विकत घेता येईल. तसेच यात Type-C चार्जिंग केबल देण्यात येईल, असे कंपनीने सांगितले आहे. याआधी हे लॅपटॉप फिलिफिन्समध्ये दाखल झाले आहेत.  

Infinix Note 11 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

Infinix Note 11 Pro स्मार्टफोनमध्ये 6.95-इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले मिळतो. विशेष म्हणजे 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा हा कंपनीचा पहिलाच फोन आहे. हा डिवाइस 180Hz टच सॅंप्लिंग रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनला MediaTek Helio G96 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB 2 स्टोरेज मिळते. यातील एक्सटेंडेड रॅम फिचरच्या मदतीने 3GB अतिरिक्त रॅम मिळतो.हा फोन Android 11 वर आधारित XOS 10 वर चालतो.   

Infinix Note 11 Pro च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 30x डिजिटल झूम असलेला 13-मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचे बोकेह लेन्स मिळते. यातील फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.   

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञानlaptopलॅपटॉप