Infinix नं गेल्या आठवड्यात आपली Infinix Note 11 सीरीज भारतीय बाजारात उतरवली होती. आज या सीरिजमधील Infinix Note 11S च्या विक्रीला सुरुवात होणार आहे. हा फोन आज म्हणजे 20 डिसेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart वरून विकत घेता येईल. या फोनमध्ये 5000mAh Battery, 8GB RAM, 33W फास्ट चार्जिंग, आणि 120Hz रिफ्रेश रेट, असे फीचर्स मिळतात.
Infinix Note 11S Price in India
Infinix Note 11S चे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. या फोनच्या 6GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 12,999 रुपये मोजावे लागतील. तर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हेज ग्रीन, मिथ्रिल ग्रे आणि सिम्फनी स्यान कलरमध्ये येणाऱ्या या स्मार्टफोनवर एसबीआय कार्ड धारकांना 10 टक्क्यांचा डिस्काऊंट देण्यात येईल.
Infinix Note 11S चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Note 11S स्मार्टफोनमध्ये 6.95-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये MediaTek Helio G96 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. Infinix Note 11S मध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा इनफिनिक्स फोन Android 11 आधारित XOS 7.6 वर चालतो. यातील 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.