इनफिनिक्स अशी कंपनी आहे जी बजेट सेगमेंटमध्ये भन्नाट स्मार्टफोन सादर करते. परवडणाऱ्या किंमतीत हायएंड स्पेक्स देणं कंपनीची खासियत म्हणता येईल. आता कंपनीनं Infinix Note 12 Series च्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. या सीरीजमध्ये Infinix Note 12 आणि Infinix Note 12 Turbo असे दोन डिवाइस सादर केले जातील. विशेष म्हणजे कंपनीनं या सीरीजसाठी Marvel Studios सह भागेदारी देखील केली आहे.
Infinix Note 12 Series ची लाँच डेट
Infinix Note 12 Series भारतात 20 मेला लाँच करण्यात येईल, असं कंपनीनं सांगितलं आहे. हे डिवाइस ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart वरून विकले जातील. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स मधील ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ चित्रपटासाठी कंपनीनं मार्वल स्टूडियोज सोबत भागेदारी केली आहे. त्यामुळे सीरिजमध्ये एखादा स्पेशल व्हेरिएंट सादर होण्याची अपेक्षा आहे.
संभाव्य स्पेसिफिकेशन
सीरीजमध्ये 6.7 इचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. हे फोन्स 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतील. तसेच स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ही आगामी सीरीज Android 12 ऑपरेटिंग सिस्टमसह येईल. स्मार्टफोनच्या अन्य फीचर्सची अधिकृत माहिती आली नाही. परंतु लिक्स आणि रिपोर्ट्समधून काही स्पेक्स समजले आहेत.
काही मीडिया रिपोर्टमध्ये स्मार्टफोनचे फोटो देखील शेयर करण्यात आले आहेत. त्यानुसार, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात 108MP चा मेन सेन्सर असेल. स्मार्टफोनमध्ये USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक मिळेल. यात widevine L1 सपोर्ट मिळेल त्यामुळे युजर्स HD कंटेंट स्ट्रीम करू शकतील.