Infinix ने काही दिवसांपूर्वी आपल्या नवीन स्मार्टफोनची घोषणा केली होती. कंपनीने 2 ऑगस्टला भारतात आपला नवीन स्मार्टफोन Infinix Smart 5A लाँच करणार असल्याची माहिती दिली होती. आता हा स्मार्टफोन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर Infinix Smart 5A साठी प्रोडक्ट पेज बनवण्यात आला येऊ आहे. या प्रोडक्ट पेजवरून फोनचा फोटो आणि स्पेसिफिकेशन्स समोर समजले आहेत.
Infinix Smart 5A हा एक लो बजेट स्मार्टफोन आहे जो वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच केला जाईल. या फोनमध्ये बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे, तर तळाला छोटासा चिन पार्ट आहे. फोनच्या मागे डावीकडे वरच्या बाजूला चौरसाकृती कॅमेरा सेटअप दिसत आहे, सेटअपमध्ये एका फ्लॅश लाईटसह दोन सेन्सर देण्यात येतील. त्याचबरोबर फिंगरप्रिंट सेन्सर आणि Infinix ची ब्रँडिग देखील आहे.
Infinix Smart 5A चे स्पेसिफिकेशन्स
इनफिनिक्स स्मार्ट 5ए मध्ये कंपनीने 6.53 इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले दिला आहे. वर सांगितल्याप्रमाणे फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल, ज्यात एआय टेक्नॉलॉजी असेल. या फोनमधील 5,000एमएएच बॅटरी सिंगल चार्जमध्ये 35 दिवसांचा स्टँडबाय टाईम, 19 तास व्हिडीओ आणि 28 तास आडियो प्लेबॅक देऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. Infinix Smart 5A ची किंमत 6,000 रुपयांच्या आसपास असू शकते, अशी चर्चा आहे.